साहित्य - ललित

उगाच काहीतरी – १४ (नॉस्टॅल्जिया)

Category:

 

हे रेडिओ चे चित्र पाहिले आणि मन चार दशके मागे गेलं. शाळेची तयारी करून वडिलांच्या सायकल जवळ त्यांच्या निघण्याची वाट पाहत उभा असलेला मी आणि कानावर ऐकू येणाऱ्या या जाहिराती

  September 3, 2022


लेखसंग्रह

सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

Category:

 

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता.

  September 3, 2022


कथा

एक परीस स्पर्श (भाग – ५६)

Category:

 

विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता..

  September 3, 2022


लेखसंग्रह

वॉशिंग मशीन एक लावणे

Category:

 

बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं. मी अनेकदा तिला म्हट्लं “अगं वॉशिंग मशीन लावतोयस का ? असं विचार ना”. त्यावर ती लगेच “का ! त्यामुळे काय फरक पडतोय ?” असा प्रतिप्रश्न करते.

  September 2, 2022


साहित्य - ललित

चमचेगिरी

Category:

 

चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो.

  September 2, 2022


साहित्य - ललित

आणि मी नाटककार झालो

Category:

 

‘कलासरगम’ नाट्यसंस्थेसाठी त्यांना राज्य नाट्यस्पर्धेत नाटक करायचं होतं. ठाणे नगर वाचन मंदिर येथे पी. सावळाराम आणि म. पां. भावे यांचा कार्यक्रम होणार होता. तो ऐकण्यासाठी मी जाणार असल्याचे विश्वासला समजलं. तो आणि विजय जोशी (दिग्दर्शक), जे आता सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, असे दोघं मिळून मला भेटायला म्हणून वाचन मंदिरात मागे हातात बाड घेऊन बसले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी मला गाठलं आणि विचारलं, ‘तुमच्याशी बोलायचं होतं.’

  September 2, 2022