हिंदू राष्ट्राच्या ध्वजाला विनम्र अभिवादन
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत.