साहित्य - ललित

सगळ्यांना पॅक करू!

Category:

 

हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते.

  August 11, 2009


लेखसंग्रह

“स्वाईन फ्ल्यू” संदर्भात “कोअर ग्रुप”ची स्थापना

Category:

 

राज्यातील इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) या संसर्गजन्य आजाराची शासनाने गंभीर दखल घेतली असून अंमलबजावणी यंत्रणेत सुसूत्रता, समन्वय आणि नियंत्रण ठेवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय कोअर ग्रुप’ची स्थापना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगितले.

  August 10, 2009


लेखसंग्रह

ओरड की पोटशूळ?

Category:

 

ज्या ज्या वेळी महागाई भडकल्याने लोकांचे जीणे हराम झाल्याचे चित्र उभे केले जाते, त्यावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखण्यासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते त्या त्या वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उत्पादनांशी असतो. भाजीपाला, कांद्याचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुष्कर होऊन जाते, विरोधी पक्षांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उत्पादनांचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे अस्वस्थ होतात.

  August 9, 2009


गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर
कथा

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

Category:

 

एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही?

  August 8, 2009


लेखसंग्रह

वनौषधीपासूनचे बिस्कीट्स-आईस्क्रीम

Category:

 

निसर्गाने मानवाला दिलेली नैसर्गिक संपत्ती ही अनमोलच आहे. त्यात कोकणाचा विचार केला तर कोकणाला लाभलेले हे निसर्गाचे वरदान पर्यटनासोबत आरोग्य संवर्धक देखील आहे. कोकणच्या जंगलात सापडणार्‍या शेकडो वनौषधी मनुष्याच्या आरोग्याला हितकारक आहेत. त्यांच्या योग्य वापराने आपण निरोगी राहू शकतो.

  August 8, 2009


लेखसंग्रह

पाकिस्तानचे अफ-ताल-काश्मिर धोरण

Category:

 

सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  August 8, 2009


व्यक्ती-परिचय

चित्रपती व्ही. शांताराम

Category:

 

व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.

  August 8, 2009


व्यक्ती-परिचय

भारतरत्न धोंडो केशव कर्वे

Category:

 

कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला

  August 8, 2009


परिचय – परिक्षण

अ बॅकग्राऊंडर ऑन महाराष्ट्र – लोकसभा २००९

Category:

 

राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात. नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा ‘बॅकग्राऊंडर’चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते.

  August 8, 2009