साहित्य - ललित

सावली

Category:

 

मुलांनी आपल्या समजतील अशीच चित्रं काढली पाहिजे असं नाही तर मुलांनी काढलेली चित्र आपण त्यांच्याकडूनं समजून घेतली पाहिजेत, असा एकनवीन शोध मला तेव्हा लागला. “मुलांच्या चित्रातलं मर्म ओळखण्यासाठी चित्रकाराची नव्हे तर तुमच्या ह्रदयातल्या प्रेमाची गरज आहे” ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

  September 24, 2010


साहित्य - ललित

चंपी मॉलीश !

Category:

 

दोन दिवस झाले.मी हॉस्पिटल मधून आमच्या घरी आले.आमचं घर त्या हॉस्पिटलपेक्षा एकदम वेगळं आहे बरं! इथे पांढऱ्या कपड्यातली नरसं नाही व कॉटवर पण पांढर्‍या चादरी नाहीत.आणि मुख्य म्हणजे इथे संध्याकाळी सात वाजता कर्कश घंटा वाजत नाही व भेटायला आलेल्या माणसांना इथे कुणी हाकलून पण देत नाही!!

  September 24, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २४ – जिमी अमरनाथ आणि विसविशीत विश्वविजय

Category:

 

भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.

  September 24, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २५ – ‘हॅन्सी’ क्रोनिए आणि मॅडम क्लेअर

Category:

 

२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्‍या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.

२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्‍या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.

  September 24, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २६ – विजय मांजरेकर आणि इअन ‘चॅपेली’

Category:

 

२६ सप्टेंबर १९३१ रोजी तेव्हाच्या बॉम्बेत विजय लक्ष्मण मांजरेकरांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे जवळजवळ नसण्याच्या काळात त्यांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे दंडक घालून देण्याजोगी फलंदाजी केली. २६ सप्टेंबर १९४३ रोजी इअन मायकल चॅपेलचा जन्म झाला. ‘चॅपेली’ या नावाने तो ‘लाडका’ आहे. अनेक लेखक-विश्लेषकांच्या मते इअन चॅपेल हा क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे.

  September 24, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २२ : कसोटी = बरोबरी

Category:

 

तोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.

  September 23, 2010


लेखसंग्रह

सप्टेंबर २३ : अंशुमन गायकवाड – द ग्रेट वॉल आणि ‘ब्लोवर’

Category:

 

राहुल द्रविड ही भारताची कसोट्यांमधील पहिली भिंत नाही. त्याच्यापूर्वीही ‘द ग्रेट वॉल’ या नावाने एक भारतीय फलंदाज ओळखला जाई. २३ सप्टेंबर १९५२ रोजी अंशुमन गायकवाडचा (मुंबईत) जन्म झाला. अंशुमनच्या वडलांनी – दत्ताजीराव गायकवाड – १९५९ साली इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

  September 23, 2010


लेखसंग्रह

ट्रिमेंडस्! फफफफफफफफंटास्टिक! मूर्तिकार मार्व्हलस मूर्तिकार

Category:

 

या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्‍या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्‍या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !

  September 23, 2010