लेखसंग्रह

आपले हृदय

Category:

 

मानवी छातीत फुफ्फुसाच्या मधोमध पण मागच्या बाजूला किंचित डावीकडे झुकलेली, डावीकडील तिसर्‍या फासळीपासून आठव्या फासळीपर्यंत एक अत्यंत कोमल लाल रंगाची, स्नायूंची बनलेली थैली आहे. या थैलीलाच हृदय असे म्हणतात.

लेखसंग्रह

औषधी वनस्पती आक/अर्क..

Category:

 

रुई किवा आक हे वृक्ष भारतात सर्वत्र आढळते.याच्या औषधी उपयोगाबाबत भारतीय आयुर्वेद शास्त्रात प्राचीन काळापासून उपयोग सांगितले आहेत.रुद्रावतार हनुमानाच्या पुजानामध्ये ह्या वृक्षाची फुले व पाने वापरण्याच्या पद्धतीवरूनही लक्षात येईल कि,बहुउपयोगी असल्यामुळेच हे झाड नष्ट होऊ नये म्हणून त्याला पूजनात स्थान दिले आहे.

लेखसंग्रह

गोडीचं मोजमाप

Category:

 

साखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं.

लेखसंग्रह

ॲ‍ॅमनिओ पॅच – एक वरदान

Category:

 

ज्या गर्भार महिलेच्या गर्भाशयातील पाणी काही कारणास्तव अचानकपणे कमी झालेले किंवा निघून गेलेले असते, अशा गर्भाची नीट वाढ होत नाही व त्याच्या जगण्याची शक्यताही धूसर होते. अशा वेळी ‘अॅमनिओ पॅच’ या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेद्वारे त्या बाळास जीवदान देता येते व प्रसूतीही चिंतामुक्त होऊ शकते. हे शक्य केले आहे नाशिकच्या एका सहृदय महिला डॉक्टरने!

लेखसंग्रह

आईबाबांनो, भांडा; पण जरा जपून, मुलं शिकताहेत!

Category:

 

आई-वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघताना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रियक्रियाप्रवर्तक (हॉर्मोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनांवर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो.

लेखसंग्रह

अल्झेमर्सचा आजार आणि आयुर्वेद

Category:

 

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.

लेखसंग्रह

औषधीयुक्त हळदीचे अर्थशास्त्र !

Category:

 

आयुर्वेदाची निसर्गदत्त अमूल्य देणगी म्हणजे हळद होय. हळद हे कंदवर्गीय पिक भारतीय जीवनशैलीतील एक अविभाज्य घटक, प्रत्येक घराघरांत तयार होणाऱ्या पक्वानांचा स्वाद, लज्जत आणि रंग वाढविणारा घटक होय.भारतीयांच्या सण उत्सवात, मंगलकार्यात हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे.