स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी,

अस्थिर आम्ही जगू शकतो ।

अस्थिर आहे जग म्हणून,

स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।

पोटासाठी वणवण फिरे,

शोधीत कण कण अन्नाचे ।

थकला देह विसावा घेई,

कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।

धरणी फिरते रवि भोवतीं,

ऋतूचक्र हे बदलीत जाते ।

जगण्यामधला प्राण बनूनी,

चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।

पूरक बनती गुणधर्म,

स्थिर वा अस्थिर ते ।

विश्वचक्र फिरवित राहणे,

निसर्गाचे तत्वची असते ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



स्थिर आहे जग म्हणूनी,

अस्थिर आम्ही जगू शकतो ।

अस्थिर आहे जग म्हणून,

स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।

पोटासाठी वणवण फिरे,

शोधीत कण कण अन्नाचे ।

थकला देह विसावा घेई,

कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।

धरणी फिरते रवि भोवतीं,

ऋतूचक्र हे बदलीत जाते ।

जगण्यामधला प्राण बनूनी,

चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।

पूरक बनती गुणधर्म,

स्थिर वा अस्थिर ते ।

विश्वचक्र फिरवित राहणे,

निसर्गाचे तत्वची असते ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author