लेखसंग्रह

हॉटेल आणि आरक्षण

Category:

 

जेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते.

लेखसंग्रह

हिमनद्यांचा इतिहास

Category:

 

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.

लेखसंग्रह

वार्धक्यातील दातांची काळजी : कवळी

Category:

 

नैसर्गिक दात चांगल्या स्थितीत ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची “संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दातांच्या काही रोगांमुळे शरीरात सेप्टिक फोकस होण्याचा संभव आहे. या कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांना थोडे किंवा सर्व दात काढून घ्यावे लागतात. दात काढल्यावर दुसरे कृत्रीम दात बसविणे जरूर आहे. असे न केल्यास जबड्याची हाडे झिजून जातात व अन्नपचनावर व शब्दोच्चारावर परिणाम होतो.

लेखसंग्रह

समाधान

Category:

 

संत तुकारामांच्या अभंगओवीत मानवी जीवनाच संपुर्ण सार पूर्णार्थाने व्यक्त झालेलं आहे. ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे आणि म्हणूनच कर्ताकरविता तो एकची भगवंत आहे आणि त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून तो माणूस सुखी समाधानी जीवन जगतो आहे हेच एकमेव सत्य आहे . याचाच अर्थ आपण स्वतः जीवनात सुखी समाधानी असणं महत्वाचं आहे.

साहित्य - ललित

तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची

Category:

 

गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं.

लेखसंग्रह

बस्ती कर्म

Category:

 

आयुर्वेदानुसार वातज विकारांसाठी ‘बस्ती’ हे शोधनकर्म परमश्रेष्ठ मानलेले आहे. वाताचे मुख्य स्थान ‘पक्वाशय’ आतडे असून, त्या ठिकाणाचा वातदोष जिंकल्यास शरीरातील इतर वातविकारांवर नियंत्रण ठेवता येते.

साहित्य - ललित

मी कात टाकली

Category:

 

अनघा राग आणि अपमानाच्या ज्वालांनी भडकून उठली होती. रात्रीचा काळोख आणि निर्जन रस्त्यावर उंच उंच इमारतींसमोरुन तिला लवकरात लवकर चालत पुढे जायचे होते. “आता पुरे झाले आणि हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे आहे. आज सर्वकाही मी स्वत: संपविते!” असे विचार विजेच्या वेगाने तिच्या मनात तरळत होते.

साहित्य - ललित

गाऱ्हाणी

Category:

 

अशाच एका कार्यक्रमात बायका म्हणजे फार वयस्कर नव्हे मैत्रीणी होत्या. आणि आपसात एकमेकींना गाऱ्हाणी सांगत होत्या. आणि मला जरा कुतूहल वाटले म्हणून ऐकत होते. तर गाऱ्हाणी विषय होता. मुलगा ऐकत नाही. लवकर उठत नाही. अभ्यासात लक्ष नाही. खेळात आवड आहे.

लेखसंग्रह

काश्मीर एक जाणीव – भाग पाच

Category:

 

तत्कालीन राज्यकर्ते, त्यांचे राजकारण, त्यांची स्वार्थी आणि संकुचित दृष्टी, त्यांच्या विकल्या गेलेल्या निष्ठा, जमिनीवर आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार, नृशंस हत्याकांडे, देशभक्तांच्या हत्या, सांस्कृतिक वैभवावरचे भीषण आघात, प्राचीन मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर विशेषत: पंडितांवर केलेले क्रूर अत्याचार, बलात्कार अशा कित्येक कहाण्या वाचायला मिळाल्या होत्या.