लेखसंग्रह

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

Category:

 

आपल्या प्रत्येक प्राचीन गोष्टीत विज्ञान लपलेले आहे. फक्त त्याला आध्यात्मिक झालर लावून व भिती घालून आपल्याला सांगितले जाते. म्हणून आपल्याला त्या अंधश्रध्दा वाटतात. यावर पुढे सविस्तर चर्चा होईलच. एवढे उच्च व प्रगतशील आपले आध्यात्म आहे. म्हणून आध्यात्माला मागासलेले किंवा अज्ञानीपणाचे न लेखता युवकांनी आध्यात्मात समरस होऊन देशाचा व स्वत:चा सर्वतोपरी विकास साधावा.

लेखसंग्रह

रूढी, परंपरा आणि तिचं सौभाग्य

Category:

 

एक विधुर म्हणून पुरुष कोणती ओळख घेऊन फिरतो सांगा तुम्हीच? त्याची बायको अल्पकाळी जाते म्हणून आपण त्याला अशुभ ठरवतो का? पण स्त्रियांच्याच बाबतीत हे सगळं का? इतर वेळी आपण बोलतो जन्माला येतानाच मृत्यूही घेऊन आलेला असतो माणूस मग अश्याच वेळी ते सगळं कुठे जात, का स्त्रीला कारणीभूत ठरवलं जात कोणाच्या मृत्यूसाठीपण?

लेखसंग्रह

भय इथले संपत नाही !

Category:

 

सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थिती निर्माण केली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले, त्यानंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव आणि आता हैदराबाद मध्ये एका पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ‘अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच! मानवी रुपात फिरणारी अशी हिंस्त्र जनावरे बघितली की माणसाला खरंच ‘माणूसपण’ ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो.

लेखसंग्रह

लग्नांचं ‘seasoning’

Category:

 

लग्नांचा season सुरू आहे. त्यामुळे साहजिकच डोक्यात लग्नाळू विषय सुरू राहातात. कुणा कुणाची लग्नं attend करता करता आसपासची next in-que मुलं-मुली आणि त्यांच्यावर focussed सर्वांच्या वधू-वर-सूचक नजरा पाहाताना हसूही येतं, आणि धास्तीही वाटू लागते. उपवर माणूस दिसलं, की करा match the pair, आणि चढवा बोहल्यावर! काय तर ही घाई! आणि ती सुद्धा त्यांचीच जास्त, ज्यांचा ह्यांच्याशी मुळ्ळी संबंध नसतो!

लेखसंग्रह

अधिकार

Category:

 

अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत.  व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे.

लेखसंग्रह

‘निर्भया’ला न्याय!

Category:

 

निर्भया प्रकरणाचे वैशिष्ट्य हेच की ती एक अपवादात्मक घटना राहिली नाही तर देशभरात महिलांवरील अत्याचाराची ती एक प्रतीकात्मक विषय बनली. या घटनेमुळे देश जागृत झाला, कायदे कठोर झाले, शिक्षेची परिभाषा बदलली. त्यामुळेचं निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशी दिल्यानंतर नुसता निर्भयाला न्याय मिळाला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण जनतेच्या दुःखावरही मलमपट्टी झाली आहे. मात्र, जखम पूर्ण बरी झाली का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्याला शोधावे लागणार आहे..!

लेखसंग्रह

मतदान नव्हे मताधिकार

Category:

 

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही.

लेखसंग्रह

झाड म्हणालं…

Category:

 

जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात.

लेखसंग्रह

पुनरुत्थान – गोव्यातील मंदिरांचे

Category:

 

सोळाव्या शतकात त्याकाळचा गोवा म्हणजे तिसवाडी, बार्देस व सालसेत या तालुक्यात जबरद्स्त प्रहार हिंदू संस्कृती वर झाला. जे काही हिदू संस्कृती म्हणून असेल ते नामशेष करायचा त्या काळी क्रिस्ती मशिनरी व राजकर्तां वीडाच उचलला होता. रुई गोम्स पेरेराच्या संशोधना प्रमाणे एकूण ५५६ (तिसवाडी ११६, बार्देस १७६ व सालसेत २६४) मोठी देवळ जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही देवतांच्या मुर्ती नदी पलिकडील शेजारच्या प्रदेशात स्थापित झाल्या

लेखसंग्रह

बालमनाला सांभाळणे आवश्यक

Category:

 

मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.