लेखसंग्रह

काटकसर

Category:

 

आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!

लेखसंग्रह

ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास……

Category:

 

ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास….. ग्रुप वरील सदस्यांच्या भिन्नकभिन्न मानसिकतेचा सांगोपांग विचार, एक शोध, अनेक बोध..

लेखसंग्रह

‘निर्भया’ला न्याय!

Category:

 

निर्भया प्रकरणाचे वैशिष्ट्य हेच की ती एक अपवादात्मक घटना राहिली नाही तर देशभरात महिलांवरील अत्याचाराची ती एक प्रतीकात्मक विषय बनली. या घटनेमुळे देश जागृत झाला, कायदे कठोर झाले, शिक्षेची परिभाषा बदलली. त्यामुळेचं निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशी दिल्यानंतर नुसता निर्भयाला न्याय मिळाला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण जनतेच्या दुःखावरही मलमपट्टी झाली आहे. मात्र, जखम पूर्ण बरी झाली का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्याला शोधावे लागणार आहे..!

लेखसंग्रह

मतदान नव्हे मताधिकार

Category:

 

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही.

लेखसंग्रह

झाड म्हणालं…

Category:

 

जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात.

लेखसंग्रह

मैत्रीची परिभाषा

Category:

 

तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते.

लेखसंग्रह

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

Category:

 

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे.