साहित्य - ललित

सैनिकाच्या मुलाची दिवाळी

Category:

 

दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?

  January 9, 2024


लेखसंग्रह

मेथी

Category:

 

अगदी हिमालय, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेथी सर्वत्र आढळते. तसेच ते श्रीलंकेपासून ते मध्य आशिया खंड, युरोप आणि अनेक आफ्रिकन खंडात हे प्रचलित आहे. आयुर्वेदात जरी हे मान्य केले तरी आज अनेक देशात मेथीचे बाबतीत संशोधन चालूच आहे. तरीही आयुर्वेदात मेथीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मेथीमुळे मधुमेह व रक्तदाब यांना अटकाव होतो, असा शोध आयुर्वेदात लावला होता. तसेच मेथी हे नुसते भाजी नसून ते अत्यंत महत्त्वाचे औषधही आहे.

  January 9, 2024


लेखसंग्रह

फ्रान्सच्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी जोन ऑफ आर्क

Category:

 

फ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते.

  January 9, 2024


लेखसंग्रह

चिंच

Category:

 

भारतात चिंच सर्व लोकांना माहीत असते पण ते भारतात कुठून व कसे आले, हे समजणे कठीणच. साधारणपणे चिंच दक्षिण आशियात झाला असावा. चिंचेचे झाड अगदी शोभिवंत तसेच डेरेदारपण असते. हे साधारण ८० फुटाचे आसपासच असते. मात्र यांच्या फांद्या वाकड्या तिकड्या वाढत असतात.

  January 7, 2024


लेखसंग्रह

सोनोमा शहर

Category:

 

सोनोमा हे सॅनफ्रन्सिस्कोपासून तासाभराच्या अंतरावर असलेले एक शहर. कॅलिफोर्नियाच्या या भागात अनेक ठिकाणी द्राक्षाचे मळेच्या मळे आहेत. त्यामुळे इकडे अनेक वायनेरीज आहेत. द्राक्षापासून ‘वाईन’ हे मद्य बनविले जाते. असे कारखाने असतात तिथे त्याच्या विक्रीची दुकाने असतात. त्यांना वायनरीज म्हणतात.

  January 6, 2024


लेखसंग्रह

कोथिंबीर

Category:

 

कोथिंबीर ही एक अतिशय सौंदर्यपूर्वक सुगंधी आणि अगदी नाजूक अशी वनस्पती आहे. १४व्या शतकात हा प्रकार ब्रिटिशांनी भातात आणला. आता मात्र असे सुगंधी सुवासिक बारीकसे रोपटे बघून संबंध जगात सर्वत्र पसरला आहे. कोथिंबीरीची फळे अगदी सोनेरी रंगाची असतात व याला आपण धणे असे संबोधतो.

  January 5, 2024


लेखसंग्रह

सोव्हिएटच्या अलौकीक धाडसी लष्करी महिला वैमानिक-लिली लिटवाक, इरा काशेरिना आणि इतर

Category:

 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सोव्हिएट युनियनच्या राज्यकर्त्यांनी तेथील स्त्रियांना लष्करातील विमानदलात मदतीस येण्यास आवाहन केले होते. लष्करी मालवाहतुकीसारखे तुलनात्मक दृष्टीने ‘सोपे’ वाटणारे काम स्त्री वैमानिकांनी करावे, अशी गुरुवातीस अपेक्षा होती.

  January 5, 2024