आत्मपूजा उपनिषद : ३ : निःसंशय जाणणं हेच आसन !
Category:
लेखसंग्रहआत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की नि:संशय जाणणं हेच आसन ! फक्त तीन शब्दात पातंजलीच्या संपूर्ण अष्टांग योगाला, हे एकच सूत्र पार करून जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्यापेक्षा; फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर राहिलं की विषय संपला !