लेखसंग्रह

महाशिवरात्री विशेष

Category:

 

आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या.

लेखसंग्रह

महाशिवरात्र

Category:

 

माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी निशीथ कालव्यापिनी असेल तो दिवस महाशिवरात्रीचा मानला जातो. यात निशीथ काल म्हणजे काय याची अनेकांना कल्पना नसेल. रात्रीच्या एकूण वेळेचे १५ समान भाग केले म्हणजे त्यातील प्रत्येक भागाला मुहूर्त असे म्हणतात. त्यातील आठव्या मुहूर्ताला निशीथ असे म्हटले जाते.

लेखसंग्रह

बुद्धीदेवता श्री गणेश – श्री शमी विघ्नेश

Category:

 

गाणपत्य संप्रदायात विजयादशमीच्या दिवशी विशेष पूजनीय असणाऱ्या या शमीच्‍या मुळाशी निवास करणाऱ्या भगवान गणेशांना श्री शमी विघ्नेश असे म्हणतात.

लेखसंग्रह

अच्युताष्टकम् – मराठी अर्थासह

Category:

 

हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे.

लेखसंग्रह

बुद्धीदेवता श्री गणेश – श्री महाबुद्धीश

Category:

 

बुद्धीने दाखविलेल्या प्रकाशात ज्या बुद्धिपतीच्या प्राप्तीचा साधनामार्ग उजळून निघतो त्या भगवान गणेशांना श्री महाबुद्धीश असे म्हणतात.

लेखसंग्रह

श्रीगणेशाचे आध्यात्मिक महत्त्व

Category:

 

गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्‍हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो.

लेखसंग्रह

बुद्धीदेवता श्री गणेश – ब्रह्म विद्येश

Category:

 

गणेश एकाक्षरी मंत्राच्या माध्यमातून मोरयाचे ओंकार ब्रह्मत्व आपल्या मनात पक्के ठसवते त्या चैतन्यशक्तीला, त्या देवी बुद्धीला ब्रह्मविद्या असे म्हणतात. ती भगवती महाबुद्धी ज्या परब्रह्म चैतन्याच्या आधारे कार्य करते त्या भगवान गणेशांना श्री ब्रह्मविद्येश असे म्हणतात.

लेखसंग्रह

बुद्धीदेवता श्री गणेश – भारतीभर्ता

Category:

 

बुद्धी ज्या तेजा वर प्रेम करते त्या परम चैतन्याला बुद्धिपती असे म्हणतात. जय भगवान श्री गणेश अशा बुद्धीचे भरणपोषण करीत असल्याने त्यांना भारती भर्ता असे म्हणतात.