olya-kajuchi-bhaji
खाद्ययात्रा

ओल्या काजूची भाजी

Category:

 

काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.

p-40-Tandul-kheer-300
खाद्ययात्रा

तांदुळाची खीर

Category:

 

तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे. ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.