शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके होत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या झोपड्यांच्या भिंती कुडाच्या, शेणा-मातीने लिंपलेल्या असतात. यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शेतमजुरी, पशुपालन, लाकूडतोड या व्यवसायांवर होतो.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मिर्‍या, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर, मुरबाड व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९५५८ कि.मी. इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १,१०,५४,१३१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

ठाणे जिल्ह्याचा इतिहास हा साधारणपणे चार टप्प्यांमध्ये विभागला जातो. पुरातन काळ-प्रागैतिहासिक काळापासून ते इ.स. १३०० पर्यंत, मुस्लीम राजवटीचा काळ (इ.स. १३०० ते १६६०), मराठ्यांचा काळ (इ.स.१६६०-१८००) व ब्रिटिश काळ (इ.स. १८८०- १९४७). प्राचीन काळापासून येथील सोपारा, कल्याण, ठाणे व संजन ही बंदरे महत्त्वाची आहेत. बौद्ध लिखाणांप्रमाणे सोपारा हे राजधानीचे शहर होते व गौतम बुध्दांच्या काळात व्यापाराचेही प्रमुख ठिकाण होते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्हा

Category:

 

जी ईश्‍वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्‍वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.

  June 25, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्‍या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. 

  June 25, 2015


ऐतिहासिक सातारा शहर
शहरे आणि गावे

ऐतिहासिक सातारा शहर

Category:

 

सातारा हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मीटर उंचीवर कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या शहराभोवती असलेल्या सात टेकडयांमुळेच या शहराला सातारा असे नाव पडलेले आहे. हे शहर मराठी साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे.

  June 24, 2015