साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ४

Category:

 

अन्नावरम हे एक आंध्र मधील गोदावरी डिस्ट्रिक्ट मधलं गाव आहे. तिथे भारतातील किंबहुना जगातील एकमेव श्री सत्यनारायण महाराज मंदिर आहे. ते डोंगरावर आहे. गाड्या वरपर्यंत जातात. भाविक तीन किलोमीटरचा डोंगर चढून जाऊ शकतात किंवा जातात.

  May 5, 2022


साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ३

Category:

 

किती अथांग आणि भव्य दृश्य होतं ते! ही अथांगता आणि भव्यता निसर्गच आपल्याला शिकवत असतो. पण एका चहासाठी आडून स्वतःचा खुजेपणा जास्तच जाणवतो. गाडीचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि मन अधीर झाले.

  April 28, 2022


साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग २

Category:

 

कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं.

  April 24, 2022


साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १

Category:

 

माझा डोळ्यांवर विश्वास बसेना! हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा… असं झालं. पिठापूर बरोबर कुरवपूर पण आणि ते सुध्धा 5 मार्चला!! मी लगेच होकार कळवून टाकला.

  April 20, 2022


साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – प्रस्तावना

Category:

 

काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते.

  April 13, 2022


साहित्य - ललित

आणि शेवट गोड झाला (माझी लंडनवारी – 37)

Category:

 

ईकडे आमच्या ग्रुपने ही मला सेंड ऑफ पार्टी दिली. परत एकदा मन,डोळे भरुन आले. खूप काही मिळालं होतं मला दोन्ही व्हिजिटमधे. माझं आणि शैलेशचं फ्लाईट एकाच दिवशी होतं पण तो आधी पोहचणार होता. त्यामुळे मुंबई एअर पोर्टवर तो मला रिसीव्ह करायला होताच.

  February 8, 2022


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गोळा-बेरीज (माझी लंडनवारी – 36)

Category:

 

ऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या.

  February 7, 2022


साहित्य - ललित

ग्लुमी पॅच (माझी लंडनवारी – 35)

Category:

 

माझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस.

  February 6, 2022


साहित्य - ललित

‘टेक इट ईझी’ पॉलिसी (माझी लंडनवारी – 34)

Category:

 

अशक्तपणा वाटत असल्यामुळे मी आरामात चालत ईमिग्रेशन काउंटरला पोहचले. पण मागच्या वेळेसारखे खूप चालणे नव्हते आणि ईमिग्रेशनची लाईनपण जास्त  नव्हती. देवच पावला! बाहेर येऊन टॅक्सी केली. आणि डायरेक्ट सडबरी टाऊनला गेले.

  February 5, 2022


साहित्य - ललित

गगन विहार’ ओळखीचा! (माझी लंडनवारी – 33)

Category:

 

प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते.

  February 4, 2022