लेखसंग्रह

मक़्ता – शब्दार्थ आणि उगम

Category:

 

हा मूळ अरबी शब्द फारसीद्वारें भारतात शिरलेला आहे. ग़ज़लच्या अखेरच्या शेरला मक़्ता कां म्हणतात ? तर, यानंतर गज़लाच शेवट होतो, आणि त्यानंतर शायर व श्रोते यांची ताटातूट होते. उर्दूतील हल्लीची प्रथा अशी आहे की, शायरचें गुंफलेल्या शेरला ‘मक़्ता’ म्हणतात, आणि शायरचें नांव नसलें तर त्याला  केवळ ‘आ.खरी शेर’ असें म्हणतात.

  August 1, 2019


साहित्य - ललित

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग ३

Category:

 

गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल  योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा.

  April 6, 2019


साहित्य - ललित

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग २

Category:

 

कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे  चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले.

  April 5, 2019


साहित्य - ललित

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग १

Category:

 

लोकसत्ताच्या दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे.

  April 4, 2019


लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग ३

Category:

 

आमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात. मी सुद्धा तुम्‍हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्‍का बसला ?  पण खरोखरच सांगतो, आपल्‍या उन्नतीसाठी आपल्‍यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.

  March 29, 2019


लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग २

Category:

 

आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्‍यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्‍यायानें सगळीकडे आम्हांस ते त्‍यांच्‍या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्‍त्रास्‍त्रनिर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्‍या चालाव्‍यात म्‍हणून अविकसित देशांना शस्‍त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक  ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्‍या हानिकारक उत्‍पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्‍यांना पुरवलें जातें.

  March 27, 2019


साहित्य - ललित

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ५

Category:

 

तेव्‍हां आपण स्‍वतःवर, आपल्‍या संस्‍कृतीवर आणि पर्यायानें आपल्‍या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्‍हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की –
हिचे पुत्र आम्‍ही, हिचे पांग फेडूं | वसे आमुच्‍या मात्र हृद्मंदिरी || जगन्‍मान्‍यता हीस अर्पू प्रतापे | हिला बसवू वैभवाच्‍या शिरीं ।।

  March 26, 2019


लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-ब

Category:

 

आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्‍कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्‍हणजे अशी शंका मांडण्‍यापूर्वी त्‍यांनीं कांहीं गोष्‍टी ध्‍यानांत घ्‍यायला हव्‍या. एक म्‍हणजे भारतातील हवामान. भारतातल्‍या मान्‍सूनच्‍या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्‍ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्‍यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्‍य ऐतिहासिक सत्‍यही येथें लक्षात घ्‍यायला हवें.

  March 25, 2019


साहित्य - ललित

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

Category:

 

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू.

  March 23, 2019


लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-अ

Category:

 

भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ?

  March 22, 2019