No Picture
साहित्य - ललित

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

Category:

 

तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ).

No Picture
लेखसंग्रह

कायदा आणि गर्भवती स्त्रिया

Category:

 

याहूनही अधिक मूलभूत एक प्रश्न आहे. कायदा हा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात असतो. उदा. – स्त्रियांना मंदिर-प्रवेश, मुस्लिमांमधील ‘ट्रिपल् तलाक’ची पद्धत. पण, स्वतःचा गर्भ ठेवणें किंवा गर्भपात करणें या  बाबीचा  समाजाशी संबंध कसा ? आपला गर्भ ठेवावा की गर्भपात करावा, हा अधिकार खरें तर त्या त्या स्त्रीलाच असला  पाहिजे. हा तिचा व्यक्तिगत   प्रश्न आहे.  समाजानें किंवा समाजाचा प्रतिनिधी म्हणून, सरकारनें, त्या स्त्रीच्या जीवनात किती हस्तक्षेप करावा, हें ठरवायला नको कां ?

No Picture
साहित्य - ललित

नरेंच केली हीन किति नारी !!

Category:

 

थोर भारतीय संस्कृती’‘असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें, अयोग्य, हीन रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजनां’ची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये.

No Picture
लेखसंग्रह

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ३

Category:

 

१७१९ मध्‍ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्‍तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्‍यानात घेऊनच. शाहूला स्‍वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्‍यासाठी त्‍याच्‍या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्‍यातील हिस्‍सा त्‍याला दिला की तो खुष होता.

No Picture
साहित्य - ललित

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-२

Category:

 

प्रथम आपण, इंग्रजी शब्‍दांचा जो मराठीत शिरकाव झाला आहे, होतो आहे, त्‍याचा विचार करुं या.

No Picture
लेखसंग्रह

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग २

Category:

 

मराठी सत्ता भारतव्‍यापी झाली ती १८व्‍या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्‍लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्‍या दिल्‍लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्‍यापूर्वी आपण १८व्‍या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.

No Picture
लेखसंग्रह

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-१

Category:

 

टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट.. 

No Picture
लेखसंग्रह

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग १

Category:

 

अठराव्‍या शतकात मराठी सत्तेने प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्षरित्‍या भारताचा बराच भूभाग आपल्‍या अधिपत्‍याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्‍येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्‍लीला धडक दिली वा दिल्‍ली काबीजही केली पण ते दिल्‍लीपती झाले नाहीत. याचे कारण म्‍हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्‍याचा मराठी भाषा, संस्‍कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्‍या स्‍वाभिमानामुळे आणि आपल्‍या आत्‍मसंतुष्‍ट किंवा अल्‍पसंतुष्‍ट वृत्तीमुळेच मराठे दिल्‍लीच्‍या उंबरठ्यावरच राहिले, दिल्‍लीपती झाले नाहीत.

No Picture
लेखसंग्रह

सबुरीचा सल्ला कशाला, महाशय ?

Category:

 

आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे !