साहित्य - ललित

महाडचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. वसंतराव पुरुषोत्तम सुळे 

Category:

 

डॉ. सुळ्यांचा उण्यापुऱ्या ६० वर्षांच्या आयुष्याचा जीवनपट म्हणजे वेगवान घटनांची एक मालिकाच होती गुजराथ मध्ये कलोल येथे जन्म. नंतर बडोदा येथे बालपण व शिक्षण वयाच्या १८ व्या वर्षी घरातून पळून जाऊन ब्रिटीश आर्मीच्या वैद्यकीय विभागात नोकरी.

  May 20, 2024


साहित्य - ललित

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नाना दुर्वे

Category:

 

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला आदर्शवत ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नारायण माधव तथा नाना दुर्वे हे होय. वयाच्या ९४ व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना त्यांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेले चढउतार स्वातंत्र्याआधीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळ यशापयशाची पर्वा न करता केलेले मार्गक्रमण या साऱ्यातून त्यांचा वेगळा इतिहास पहावयास मिळत आहे.

  May 19, 2024


साहित्य - ललित

स्त्री मुक्ती आभास की आव्हान

Category:

 

जिच्या पासून एक ‘विश्व’ तयार झाले अशी स्त्री ही अनंत काळाची माता आहे. दैत्यांचा संहार करणारी देवता तिचा आपण सन्मान करतो. माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोन्हीही सारखेच महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये अनेक गुण समान असतात मग असे असताना स्त्री ही पुरुषांइतकी समाजात किंवा कुटूंबात मुक्त आहे काय? माझ्या विचारांती मी प्रथम भारतीय स्त्री मुक्ती आभास की आव्हान या विचार प्रवाहात डोकावणार आहे.

  May 17, 2024


साहित्य - ललित

ग्लोबलायझेशन आणि वृद्धाश्रम

Category:

 

प्रचंड उलथापालथीतून पृथ्वी निर्माण झाली. पुढे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. अप्रगत आदिमानवाचे रुपांतर आज आधुनिक महामानवात झाले. देश, सत्ता, भूखंड इतकेच काय तर ग्रह, ताऱ्यांवरही अभ्यासपूर्ण बोलले जाऊ लागले. आपला देश, आपले राष्ट्र याविषयीचा जाज्वल्य अभिमान जोपासला जाऊ लागला…

  May 16, 2024


लेखसंग्रह

स्वच्छता

Category:

 

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.

  May 10, 2024


व्यक्ती-परिचय

पंडित मालवीय

Category:

 

संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही.

  May 1, 2024


साहित्य - ललित

अंतराळातील अश्वत्थामा

Category:

 

मी आणि अय्यर जिवश्‍चकंठश्‍च मित्र होतो. आता होतो असंच म्हणायला हवं. कारण अय्यर आता हयात नाही. नाही तरी कसं म्हणावं? कदाचित असूही शकेल. असला तरी देखील तो मला आणिमी त्याला या पृथ्वीतलावर भेटू शकणार नाही हे मात्र निश्‍चित.

  April 29, 2024


लेखसंग्रह

झापगावचा प्राचीन भूपतगड

Category:

 

…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात.

  April 29, 2024


लेखसंग्रह

मराठीतील भाषांतरे-रूपांतरे आणि दुर्गा भागवत

Category:

 

दुर्गा भागवतांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र लोकसाहित्याचे. मराठीत भाषांतरित झालेल्या लोकसाहित्याबद्दल दुर्गाबाईंच्या खूप तक्रारी होत्या. मराठीत उत्तम अनुवादकांची वाण तेंव्हाही होतीच. भाषांतरावरून भाषांतरे करणे, संक्षिप्त रुपांतरे करणे, रूपांतर करताना मूळ नावे, स्थळे, घटना इत्यादी बदलून टाकण्याची भ्रष्ट प्रथा महाराष्ट्रात पडली त्याविषयी दुर्गाबाई नाखूष होत्या. या नाखुषीतून त्यांनी आगरकरांच्या हॅम्लेटलाही सोडले नाही.

  April 28, 2024