व्यक्ती-परिचय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Category:

 

डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

  December 6, 2021


दिनविशेष

व्हेअर ईगल्स डेअर चित्रपट

Category:

 

काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची तितकीची गुंतागुंतीची पण प्रभावी पटकथा मॅक्लिननेच लिहिली आहे. या संपूर्ण चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. बर्फाच्छादित आल्प्सपर्वताची. जर्मनीचा बवेरिया प्रांत व ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्समध्ये खूप उंचावर असलेल्या श्लॉक अटलर या एका किल्ल्यात यातले बहुतांश कथानक आकार घेते.

  December 4, 2021


व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध गणितज्ज्ञ उमर खय्याम

Category:

 

एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत.

  December 4, 2021


व्यक्ती-परिचय

अभिनेते उदय टिकेकर

Category:

 

उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.

  December 4, 2021


दिनविशेष

भारतीय नौदल दिन

Category:

 

३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली.

  December 4, 2021


दिनविशेष

गेटवे ऑफ इंडिया ९७ वर्षाचे झाले

Category:

 

मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.

  December 4, 2021


व्यक्ती-परिचय

गोव्यातील ओल्डचर्चमधील सेंट फ्रान्सिस झेविअर

Category:

 

गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं.

  December 3, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतीक दिव्यांग दिवस

Category:

 

शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, व दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो.

  December 3, 2021


दिनविशेष

भोपाळ वायूदुर्घटनेची ३८ वर्षे

Category:

 

भोपाळमध्ये ‘सेविन’ (कार्बरिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाइल आयसोसायनेट व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. द्रव स्थितीत असलेला मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) वायूरूप अवस्थेत अत्यंत विषारी असल्याची पूर्ण कल्पना अमेरिकी, तसेच भारतीय कंपनीला होती. या एमआयसीचं रूपांतर वायूत होऊ नये म्हणून जमिनीखालच्या थंड टाक्यांमधून तो साठविला जात असे.

  December 3, 2021