चहाचे विविध प्रकार

सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते.



सीटीसी चहा.

सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते. या प्रक्रियेत काही बदल होतात. चहाची चव आणि सुवास वाटतो. पण हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही आणि तितका आरोग्यकारीही नसतो.

ग्रीन टी.

या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो. यात अँटी-ऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत. हा चहा दूध आणि साखर न घालता प्यावा. यात कॅलरीही नसते. ग्रीन टीपासूनच हर्बल आणि ऑर्गेनिक चहा तयार केले जातात.

हर्बल चहा.

ग्रीन टीत तुळस, अश्व गंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात. बाजारात हर्बल टी तयार पाकिटातून मिळतो. सर्दी खोकल्यावर हा हर्बल चहा गुणकारी आहे. औषध म्हणून याचा वापर जास्त होतो.

ऑर्गेनिक टी.

ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात. हा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो.

व्हाईट टी.

हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. काही दिवसांच्या चहाच्या कोवळ्या पानांपासून हा तयार केला जातो. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो. यात कॅफिनही खूप कमी आणि अँटी ऑक्सिडंट सर्वात जास्त असतात. एक कप व्हाईट टीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅफीन असते. तर ब्लॅक टीमध्ये 40 आणि ग्रीन टीमध्ये 20 ग्रॅम कॅफिन असते.

ब्लॅक टी.

कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो. पण कोणत्याही प्रकारचा चहा ब्लॅक टीच्या रूपात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

इन्स्टंट चहा.

या वर्गात टी बॅग्ज वगैरे येतात. म्हणजे पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार. टी बॅग्जमध्ये टॅनिक अॅहसिड असते, हे नैसर्गिक अॅोस्ट्रीजेंट असते. यात विषाणूरोधक आणि जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळेच टी बॅग्ज सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जातात.

लेमन टी.

लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात.

मशीनचा चहा .

अनेक ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये पैसे टाकल्यावर लगेच चहा मिळतो. गरमागरम चहा पिण्याचे समाधान याशिवाय या चहातून काही मिळत नाही. कारण यात कोणताही घटक नैसर्गिक नसतो.

इतरही काही प्रकारचे चहा आहेत, त्यात ताण घालवण्यासाठीचा चहा, रिजूविनेटिंग, स्लिमिंग टी आणि आईस टी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या चहांमध्ये विविध प्रकारच्या वनौषधी मिसळलेल्या असतात. उदाहरणार्थ दालचिनी, तुळस वगैरे. दालचिनीमुळे ताजेतवाने वाटते तर तुळशीमुळे प्रतिकारकशक्ती वाढते. स्लिमिंग टीमध्येही वजन कमी करण्यास मदत करणारे घटक आहे. चयापचय क्रियेचाही स्तर थोडा वाढतो. पण हा चहा केवळ पूरक म्हणून प्यावा. केवळ या चहाने वजन कमी होत नाही. आईस टी मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून तो पिणे हिताचे नाही.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author