व्यक्ती-परिचय

विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर)

Category:

 

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता.

व्यक्ती-परिचय

सचिन रमेश तेंडुलकर

Category:

 

क्रिकेट मधील एक चमत्कार म्हणून सचिन तेंडुलकरकडे पाहिलं जातं कारण फलंदाजीतलं कौशल्य, चिकाटी, खेळताना वापरलेलं तंत्र आणि सातत्य यांच्या सहाय्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह वीस हजाराच्या वरती धावा करताना सचिनने अनेक विक्रम प्रस्थापित केले. सचिन तेंडुलकर याचा जन्म २४ एप्रिल, १९७३ रोजी मुंबई येथे झाला.

व्यक्ती-परिचय

सई परांजपे

Category:

 

नाटककार, लेखिका आणि उत्कृष्ट नाट्यसिने दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई परांजपे यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे बालसाहित्य लेखिका. एक वेळ प्रौढ साहित्य लिहिणे हे सहज शक्य असते मात्र बालसाहित्य हे तेवढेच अवघड काम. परंतु सई परांजपे हे अवघड काम आपल्या लेखणीद्वारे सहजतेने करून जातात आणि ते सहज असतं म्हणूनच सुंदर होतं.

वसंत कानेटकर
व्यक्ती-परिचय

वसंत कानेटकर

Category:

 

महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे दर्जेदार नाटकांचे लेखक वसंतराव कानेटकर. फक्त नाटककार नाही तर कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन करणारे वसंतराव कानेटकर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व.

व्यक्ती-परिचय

दुर्गा नारायण भागवत

Category:

 

एक विदुषी, तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इ. विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. दुर्गाबाईंचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला.

व्यक्ती-परिचय

विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

Category:

 

एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज.

व्यक्ती-परिचय

डॉ. अरुणा ढेरे

Category:

 

मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी रोपं आपली वाढ हरवून बसतात, असं म्हणतात! पण केळीची जनरीतच वेगळी. तिच्या गाभ्यातूनच नवी केळ जन्मला येते, तिचंच रंगरूप घेऊन. अरुणा ढेरे यांचं अस्तित्व असं आहे. त्याही थेट आपल्या वडिलांचेच गुण घेऊन जन्माला आल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

जयंत साळगावकर

Category:

 

लेखक, संपादक, प्रकाशक, ज्योतिषतज्ज्ञ आणि सातासमुद्रा पार गेलेल्या अनेक भाषांतून प्रकाशित होणार्‍या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा म्हणजे ज्योर्तिभास्कर जयंत शिवराम साळगावकर. साळगावकरांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण या गावी झाला.

व्यक्ती-परिचय

वसंत आबाजी डहाके

Category:

 

कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असलेले वसंत आबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्राला साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळा छंद त्यांनी आयुष्यभर जपला आणि तो म्हणजे चित्रकलेचा ! वसंत आबाजी डहाके यांचा जन्म विदर्भातला. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला.

व्यक्ती-परिचय

गोपाळकृष्ण गोखले

Category:

 

भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोतळुक या गावी झाला.