श्री शारदा भुजंगप्रयात – भाग २
Category:
लेखसंग्रहजगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले.