साहित्य - ललित

माझं भाषण

Category:

 

नोबेल पारीतोषिकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानी अचानक मला बोलायची वेळ आल्यावर वरील संकल्पनेवर आधारीत चार शब्द मी बोलत सुटलो. कुठल्याही शब्दाचा दुसर्‍या शब्दांशीच काय प्रसंगाशीही संबंध नाहीये तरीही बोलण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला… 

साहित्य - ललित

माझा भाबडेपणा

Category:

 

माझा भाबडेपणा माझ्या सख्या शिक्षकांनीही कधी गांभिर्यानी घेतला नाही. ” कोणाला काही शंका असल्यास आवश्य विचारा ” एवढे फक्त म्हणायचे आणि शंका विचारण्यासाठी मी कधीही हात वर केला की एखाद्या संशयित आरोपीसारख माझ्याकडे बघायचे.

साहित्य - ललित

तव्यावर झुणका अन् मणक्यावर दणका

Category:

 

बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली.

साहित्य - ललित

मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेस

Category:

 

या मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेसमुळेच कित्येक नवीन लेखक, कवी जन्माला आले, माहितीचा प्रसार त्वरित होऊ लागला, निवृत्त आणि एकाकी जेष्ठ नागरिक आणि गृहिणींना हक्काचा विरंगुळा मिळाला, नवनवीन तंत्रज्ञानाशी तोंडओळख होते, वगैरे वगैरे..

साहित्य - ललित

युरोपायण सहावा दिवस – टीटीसी – हाईन फॉल्स

Category:

 

कोलोनचे हॉटेल सोडून ब्लँक फॉरेस्टच्या घनदाट जंगलामार्गे आम्ही अंदाजे साडे चार पाच तासात सुमारे 490 किमी अंतर पार केले आणि टीटीसीच्या कूकू क्लॉक फँक्टरी भागात, भात, पोळीला फाटा देउन, चविष्ट राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर जेवण होत. तिथून पुढचा -हाइन फॉल (Schaffhausen Neuhausen) हा 85 ते 90 किमीवर आहे. या मार्गावरुन जाताना दूतर्फा निसर्गानी हिरवेगार गालिचे अंथरले होते. मधेच काही टुमदार उतरत्या छपरांची घर दिसत होती. घरांच वेगळेपण डोळ्यात भरणार होत. काही वेळातच जर्मनीची हद्द पार करुन आम्ही स्वित्झरलंडमधे प्रवेश केला आणि -हाईन फॉल्सकडे आगेकूच केली.

साहित्य - ललित

युरोपायण सातवा दिवस – माउंट टिटलिस, ल्युसर्न.

Category:

 

ल्युसर्नला लायन मॉन्युमेंट पाह्यला आणि त्याच भागात बुखरर आणि कासाग्रँडे या भव्य दालनांमधे मनमुराद (विंडो) शॉपिंग केले. काहींनी स्विसमेक घड्याळ आणि देण्याघेण्यातली सॉव्हेनीर्सही घेतली. या नंतर ल्युसर्नची बोट राईड, वाईन, स्विस फोक म्युझिक आणि डिनर असा दीड तासाचा मौज मस्तीचा कार्यक्रम पार पडला. धमाल आली. #वीणा वल्ड# च संघटन कौशल्य या कार्यक्रमात दिसुन आल. सर्व अबालवृध्द मनमोकळेपणे नाचले, बागडले.

साहित्य - ललित

युरोपायण पाचवा दिवस – रोटरडँम – अँमस्टरडँम – कोलोन

Category:

 

रोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. रस्तेही भव्य आहेत. ब्रेकफास्ट आवरुन हॉलंडच मिनी व्हर्शन, मदूरोडँम, बघायला जायच ठरल.

साहित्य - ललित

युरोपायण नववा दिवस – व्हेनिस

Category:

 

इन्सब्रुकच्या ऑलेंम्पीया हॉटेलमधुन पाय काढवत नव्हता पण साडे सातच प्रयाण टाळण शक्य नव्हत. दुतर्फा अप्रतीम सृष्टीसौंदर्याचा नजारा न्यहाळत शेवटी 400 किमीवरील इटलीतील व्हेनिसला निघालो. हिरव्यागार दिसणा-या डोंगरावरची लहानमोठी घरे, हॉटल्स, चर्चेस सर्वकाही अत्यंत प्रेक्षणीय दिसत होत.

 

साहित्य - ललित

युरोपायण – तिसरा दिवस – पँरीस- स्पर्श

Category:

 

हीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो.

साहित्य - ललित

युरोपायण – दुसरा दिवस – लंडन

Category:

 

कालच्याच मर्सिर्डिस बसनी आज लंडनच्या सीटी टूरला सुरुवात झाली. दूतर्फा दिसणा-या इमारतीतील घरबांधणीची वैशिष्ठ्य सर्वांनाच आकर्षित करत वाह व्वा मिळवात होती. तपकिरी रंगाच्या विटांच्या बांधकामावर पांढ-या शुभ्र रंगाच्या आयताकृती खिडक्या, दरवाजे आणि स्वच्छ काचा हे सर्व एकत्रित फारच उठावदार दिसत होते. या इमारती फार टोलेजंग नाहीत परंतु लांबवर पसरलेल्या आहेत. बाल्कनी आत घेउन रुम वा जागा वाढवणे असा प्रकार कुठेच दिसला नाही