अवर्गिकृत

जग जाहिरातीचे

Category:

 

पुस्तक लिहिण्यामागे जसा विद्यार्थ्यांचा विचार आहे तसाच छोट्या जाहिरातदारांचाही विचार आहे. अनेकांना या शास्त्राविषयी माहिती नसल्याने जाहिरातीवर खर्च केलेल्या पैशाचा पुरेसा लाभ घेता येत नाही. कमीत कमी पैशातही उत्तम जाहिरात होऊ शकते. मात्र त्यासाठी या विषयाचे पुरेसे ज्ञान पाहिजे. त्यांनाही उपयुक्त होईल, या विषयाकडे पाहण्याची त्यांची विचारधारा बदलेल ही. तसेच ज्याला कुणाला या क्षेत्रात काम करायचे आहे, जे या क्षेत्रात काम करीत आहेत, पण औपचारीक शिक्षण घेतलेले नाही, ज्यांना आपल्या व्यवसायासाठी जाहिरातीचा वापर करायचा आहे अशा सर्वांसाठी उपयुक्त व्हावे.या हेतूने हे पुस्तक आहे.

अवर्गिकृत

श्री गुरुचरित्र जसे आहे तसे

Category:

 

कोणत्याही कर्मकांडाचा कंटाळा असणाऱ्या पर्यंतही अध्यात्मिक ज्ञान पोहचावे. ज्यांना वय/प्रकृती आदी नानाविध कारणांमुळे मूळ अलौकिक श्री गुरूचरित्राचे वाचन/पारायण इच्छा असून शक्य होत नाही आणि साररूपाने ज्यांचे समाधान होत नाही, अशा सर्वांसाठी श्री गुरूचरित्र जसे आहे तसे हा अनुवाद दत्तभक्त श्री. बाळ पंचभाई यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने सिद्ध केला आहे. सर्व प्रकारच्या भाविकांनी याचे वाचन करून भावार्थ जाणावा व स्वत:चे कल्याण करून घ्यावे, यासाठी हे प्रकाशन आहे. केव्हाही, कुठेही, कोणालाही, कसेही याचे वाचन करता येईल, हे याचे वैशिष्ट्य होय.

अवर्गिकृत

चिरविजय भारतीय स्थलसेना

Category:

 

वाचकांना स्थलसेनेची रचना, कार्य आणि उपलब्धींबद्दल सर्वंकष माहिती दिली आहे. स्थलसेने बद्दल ची सर्व माहिती वस्तुत: देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याचमुळे या विषयात स्वारस्य असणाऱ्या तसेच अजाणतेपणानी इंडियन आर्मी आणि इंडियन आर्मड कोर्सेस यांच्यात गल्लत करणाऱ्या वाचकांना भारतीय स्थलसेनेच्या गौरवशाली इतिहास आणि वर्तमानबद्दल माहिती देण्यात हे पुस्तक सफल झाले आहे.

लेखसंग्रह

झाडीपट्टी – गडचिरोलीची नाट्यसंस्कृती

Category:

 

झाडीपट्टी म्हणजे आजुबाजूला गर्द झाडी (जंगल) आणि त्याजंगलातून जाणारी एक निमुळती वाट आणि अचानक एक छोटसं गाव येतं आणि त्या गावात नाटक होते. त्यालाच झाडीट्टी असे म्हणतात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात मिळून हा महोत्सव सर्व शेतकरी वर्ग दिवाळी ते होळी या चार महिन्यात उत्सवासारखा साजरा केला जातो. 

अवर्गिकृत

लिखाण

Category:

 

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, …..

अवर्गिकृत

पीएफविषयी सर्व काही

Category:

 

भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडविषयी (पीएफ) कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास मंडळाची अधिकृत वेबसाइट www.epfindia.com हा उत्तम मार्ग आहे.

अवर्गिकृत

भारतातील सर्वात वयोवृद्ध पालघरमध्ये

Category:

 

जगातील केवळ मोजक्याच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.