शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती

Category:

 

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर- यांचा जन्म मालवण येथे झाला. ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवणारे संस्कृतचे पहिले भारतीय प्राध्यापक होते.१८९५ ते १८९७ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते कार्यरत होते.१९११ साली दिल्ली येथे भरलेल्या दरबारात त्यांना ‘सर’हा किताब देण्यात आला. पुण्यात यांच्या नावाने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सुरू करण्यात आली.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

“दशावतार” हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असा सांस्कृतिक कलाविष्कार आहे. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतो.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्यातील सागरतटीय जिल्हा आहे, व याचे प्रशासकीय केन्द्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले (३७), जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दळणवळण

Category:

 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तेरे खोलची खाडी हे राज्याचे अगदी दक्षिणेकडील टोक असून,या खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्ये जोडली गेली आहेत. मुंबई-पणजी-कोची (म्हणजेच मुंबई – गोवा) हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ या जिल्ह्यातून गेला आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उद्योग

Category:

 

सिंधुदूर्ग जिल्ह्यात सुमारे १२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यात एकूण १८ खाड्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच मत्स्य व्यवसाय हा येथील एक महत्त्वाचा, आर्थिक प्राप्ती करून देणारा व्यवसाय ठरला आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावर व सागरी सुरक्षिततेसाठी अजिंक्य असा जलदुर्ग बांधणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिल्ह्यातील कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग ह्या किल्ल्याची उभारणी केली.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्हा

Category:

 

सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्‍या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.

  June 26, 2015