साहित्य - ललित

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

Category:

 

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).

  August 19, 2022


अवर्गिकृत

आनंद माडगूळकर युट्युब चॅनेल

Category:

 

आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या.

  August 17, 2022


लेखसंग्रह

सदगुरु श्री स्वामी स्वरूपानंद

Category:

 

घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती.

  August 11, 2022