आंबा आहे फळांचा राजा
मधुर रसदार हापूसची मजा
फणसाला बुवा काटेच फार
रसाळ पिवळा गरा मात्र चवदार
केळी हिरवी, पिवळी किंवा वेलची
पौष्टिक गोड, रोजरोज खायची
द्राक्ष कशी घोसाला लगडलेली
सुमधुर, टपोरी नाशिकवाली
आईला म्हणावं फळं रोजच आण
चवीला छान नि आरोग्याचीही खाण
– यतीन सामंत
Author
Post Views: 9