सज्जनगड
शहरे आणि गावे

सज्जनगड

Category:

 

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे.

  December 15, 2015


पुणे विद्यापीठ
शहरे आणि गावे

पुणे विद्यापीठ

Category:

 

एकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. नुकतेच या विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. आते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाते.

 

  December 15, 2015


नागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर
शहरे आणि गावे

नागपूरचे ड्रॅगन पॅलेस मंदिर

Category:

 

नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस हे विशाल प्रतिष्ठित मंदिर आहे. १० एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आलेले हे मंदिर शांतीपूर्ण बौध्द प्रार्थना केंद्र आहे. ओगावा सोसायटी द्वारे हे मंदिर बांधण्यात आलेले आहे.

 

  December 5, 2015


पुण्याची मंडई
शहरे आणि गावे

पुण्याची मंडई

Category:

 

तेव्हा पुण्याची लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजीपाला आणि फळांचा बाजार शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या ‘क्रॉफर्ड मार्केटच्या’ धर्तीवर पुणे शहरातही बंदिस्त मंडई बांधावी, असा विचार करुन १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला गेला.

  December 5, 2015


पंडित नेहरू नॅशनल पार्क
शहरे आणि गावे

पंडित नेहरू नॅशनल पार्क

Category:

 

नागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.

  November 23, 2015


नागपूरची सीताबर्डी
शहरे आणि गावे

नागपूरची सीताबर्डी

Category:

 

सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.

  November 23, 2015


मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी
शहरे आणि गावे

मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी

Category:

 

मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे. इ.स. १७६७ साली व्हिक्टोरीया टर्मिनसच्या बांधकामावेळी इंग्रजांनी मुंबादेवीचे पुरातन मंदीर हटवून काळबादेवी-भुलेश्वर भागात बांधून दिले.

  November 22, 2015


महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती

Category:

 

महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.

  November 21, 2015


प्राचीन मांढळ
शहरे आणि गावे

प्राचीन मांढळ

Category:

 

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.

  November 21, 2015