साहित्य - ललित

श्री शिल्लक

Category:

 

तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता .

साहित्य - ललित

मटालोखा मॉल

Category:

 

मॉल प्रशस्त होता, हायफाय होता, आकर्षक होता. चकचकीत होता आणि अत्याधुनिक होता. इंटिरिअर भुरळ पडणारे होते. कुठल्याही बाजूने पाहिले तरी सहज दिसणारे, उंचावर असणारे, रंगीत, झगमगीत असे मॉलचे नाव खुणावत होते. मटालोखा मॉल

साहित्य - ललित

मैत्र पत्रांचे – ४

Category:

 

माझ्या आजोबांच्या वयाचा एक वाचक माझी किती काळजी करतो हे बघून वाचक या संज्ञेबद्दल माझा आदरभाव कित्येक पटीने वाढला. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. पण पत्रांच्या रूपाने ते आजही माझ्यासोबत आहेत, हा मोठा दिलासा वाटतो आहे.

साहित्य - ललित

मैत्र पत्रांचे – ३

Category:

 

मैत्र पत्रांचे हा विषय घेतल्यावर आत्तापर्यंत आलेली सगळीच पत्रं, मी पहिल्यांदा, मी पहिल्यांदा करत फाईल्स मधून बाहेर डोकावू लागली. मग थोडा वेळ शांत बसलो आणि अचानक एका पत्रानं लक्ष वेधून घेतलं.
ते पत्र फार वेगळं होतं. मोत्यांची माळ गुंफावी तसं अक्षर होतं.

साहित्य - ललित

मैत्र पत्रांचे – २

Category:

 

रांगणाऱ्या मुलाला चालायला शिकवणारे आणि चालणाऱ्या मुलाला सावरायला शिकवणारे जे शब्द वा वृत्ती असते तशी काही पत्रे माझ्या संग्रही आहेत. ती पत्रे जेव्हा येत होती तेव्हा त्या त्यावेळी मला धक्के बसत होते. अर्थात सुखद धक्के. कारण मराठी साहित्यातील नामवंत लेखक, समीक्षक, कलाकार आपण होऊन माझे साहित्य वाचतील आणि अभिप्रायार्थ पत्र लिहितील ही मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आज फाईल्स चाळताना काही पत्रे मिळाली आणि पुन्हा एकदा धन्यता वाटली.

साहित्य - ललित

मैत्र पत्रांचे – १

Category:

 

आयुष्यात अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींची वाट पहात असतो. माणसं , नाती , वेळ , संधी अशा अनेक गोष्टी … १९८५ पासून माझ्या आयुष्यात या सगळ्याबरोबर आणखी एका गोष्टीची भर पडली. ती गोष्ट म्हणजे वाचकांची पत्रे आणि ती घेऊन येणारे पोस्टमनदादा.

साहित्य - ललित

मुक्ताचे क्षितीज

Category:

 

वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.

साहित्य - ललित

विक्रम – वेधा

Category:

 

आर. माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय, अंडरवर्ल्डचे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण, पोलिसदलातील अंतर्गत राजकारण, अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी.