साहित्य - ललित

अर्थसंकल्प आणि झिपऱ्या !

Category:

 

झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता.

  February 12, 2021


लेखसंग्रह

बदामी केव्ह, कर्नाटकमधील अनपेक्षित क्षण

Category:

 

कर्नाटकातील बदामी येथील अतिशय उंच आणि अतिविशाल खडकात कोरलेली लेणी पहायला मी आणि सौभाग्यवती जातो काय आणि सर्वात उंच असलेल्या खडकात कोरलेल्या लेण्यांसमोरच्या प्रांगणात निवांत बसलेले डॉ . प्रकाश आमटे आणि सौ. मंदाताई आमटे, दिसतात काय , सगळं अगदी अनपेक्षित आणि तरीही आनंददायक .

  February 10, 2021


साहित्य - ललित

आभाळाएवढा !

Category:

 

त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती .

  January 13, 2021


साहित्य - ललित

सांगतो वडिलांची कीर्ती

Category:

 

सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत .

  January 4, 2021


लेखसंग्रह

हे रुधिर शांत का षंढ थंड हृदयात ?

Category:

 

हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय !

  December 12, 2020


साहित्य - ललित

हे रुधिर शांत का षंढ थंड हृदयात ?

Category:

 

हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय !

  December 12, 2020


साहित्य - ललित

।। दिठी ।।

Category:

 

पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती. मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती. वस्त्रप्रावरणांनी देहाला आलंकृत करणं सुरु होतं. तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार दर्पण समोर धरला. आणि विठुराया पाहात राहिला.

  December 10, 2020


साहित्य - ललित

या वर्षीच्या दिवाळीत…

Category:

 

“कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून, रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला.

  November 13, 2020


साहित्य - ललित

पानगळीचे दिवस (कथा – सांगोपांग : ४)

Category:

 

तसं पाहायला गेलं तर ही कथा एका चौकोनी कुटुंबाची , उपनगरातील एखाद्या ब्लॉकमध्ये घडणारी आहे. पण मांडणी करताना त्या फ्रेममध्ये दरवेळी बाह्य जगातील संदर्भ येत जातात आणि मग ती कथा एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता अनेकांची होऊन जाते. निष्पर्ण वृक्षाबद्दलचं प्रेम , आपुलकी मनात उगवत जाते आणि पानगळीचे दिवस सुसह्य होऊन जातात.

  November 12, 2020


साहित्य - ललित

प्रश्नोपनिषद (कथा – सांगोपांग : ३)

Category:

 

आजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती. सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं. त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं . प्रश्नोपनिषद

  November 11, 2020