साहित्य - ललित

ह. म. बने, तु. म. बने

Category:

 

एकच सांगतो – त्या दिवसापासून मी ही मालिका पाहू लागलो. हरवत चाललेल्या (म्हणूनच हव्याहव्याशा ) कुटुंब संस्थेतील तीन पिढ्यांचे घट्ट भावबंध मी आवडीने बघतोय. शेवट थोडासा प्रचारकी /उपदेशपर होतो कधी कधी पण वीण मस्त. खूप दिवसांनी चांगली दैनिक करमणूक !

  February 8, 2021


साहित्य - ललित

सर’ – हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो !!

Category:

 

गुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.

  January 25, 2021


साहित्य - ललित

भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन

Category:

 

भक्ती बर्वे -इनामदार आणि जया भादुरी -बच्चन यांच्यात एरवी वरवरचे एकच साम्य वाटेल -दोघीही माहेर -सासरचे आडनांव लावतात. फारतर दोघीही उच्च प्रतीच्या अभिनेत्री ! पण त्या दोघींमधील गुह्य एका हृद्य प्रसंगाने अनुभवले.

  January 22, 2021


साहित्य - ललित

एकांकिकेला कथेचे “कलम”

Category:

 

मागील आठवड्यात माझ्या शालेय मैत्रिणीच्या मुलीने फोन केला- पुढील महिन्यात तळेगांवला होणाऱ्या एका एकांकिका -वाचन स्पर्धेसाठी तिला (माझ्याकडे एखादी रेडिमेड असली तर ती किंवा नवी लिहिणं शक्य असेल तर नवी) माझी एक एकांकिका १५ ऑगस्टच्या आत हवी होती. पात्रं तीन हवीत आणि वाचन -कालावधी किमान एक तास ! ती “पुरुषोत्तम” आणि “फिरोदिया” वाली नवी पिढीची आणि मी एकांकिका -लेखन थांबवून २५ हून अधिक वर्षे झालेली.

  January 21, 2021


साहित्य - ललित

देशप्रेमाचा ज्वर

Category:

 

नवं वर्षाच्या प्रथम दिनी सहज लेखा -जोखा घेत होतो. फेब्रुवारी १०, २०२० ला थिएटर मध्ये जाऊन ” शिकारा ” हा चित्रपट पाहिलेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर ” चेहेरा-पुस्तिकेवर ” लिहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितलेला नाही, पण २०२० साली चित्र /नाट्य विषयांवर तब्बल ३६ नोंदीवजा लेखन झालंय चेहेरा-पुस्तिकेवर ! कोरोना च्या कृपेने दूरदर्शन आणि लॅपटॉप च्या पडद्याला डोळे डकवून घेतल्याचा परिणाम. त्याबद्दल कोरोना चे “आभार” (?)

  January 20, 2021


लेखसंग्रह

जीवनाची गुणवत्ता !

Category:

 

१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन (John Flanagan) या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली-

  January 18, 2021


लेखसंग्रह

संत

Category:

 

संतांचे माहात्म्य साध्या फूटपट्ट्यांनी मोजता येत नाही. त्यांच्या सान्निध्यात केलेल्या ध्यानाने सर्व शंका दूर होतात आणि “आतील “दिवे प्रज्वलित होतात. संतांचे जीवन प्रेरणादायी असते, त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्याने मुक्ती मिळते. त्यांच्यातील अध्यात्मिक स्पंदनांनी आपला भवताल स्वच्छ होतो. संत असे सारभूत असतात.

  January 16, 2021


साहित्य - ललित

थप्पड’ – शेवाळलेल्या नात्यांसाठी आवश्यक ‘तुरटी’ !

Category:

 

हा चित्रपट आला , चांगलं परीक्षण वाचलं आणि तो गेलासुद्धा ! नुकताच तो घरबसल्या बघायला मिळाला. लॉक डाउन बाबा की जय ! सगळीच नाती सुरुवातीला जुळताना /जुळविताना हवीहवीशी, नवलाईची असतात. कालांतराने अतिपरिचयात त्यांच्यावर शेवाळं साचतं. दोन्ही बाजू एकमेकांना गृहीत तरी धरायला लागतात किंवा ते टिकविण्याचा एकतर्फी प्रयत्न तरी पाहायला मिळतो.

  January 13, 2021


साहित्य - ललित

काही माणसं ” अशीच ” असतात !

Category:

 

” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी.

  January 11, 2021


साहित्य - ललित

समूहाचा पराभव !

Category:

 

मतकरींची एकटाकी लेखणी अधिक प्रभावी , चित्रदर्शी वाटली. माध्यमांतरात अशा तुलना अपरिहार्य , पण  चित्रपट कादंबरीच्या आसपास पोहोचू शकला नाही.  सगळं इंटेन्स नाट्य डायल्युट झालं आणि त्यामुळे निराशा झाली. चित्रपट ही सामूहिक घटना असली तरी मतकरींच्या एका लेखणीपुढे प्रभाव निर्माण करण्यात समूह पराभूत झाला.

  January 9, 2021