लेखसंग्रह

मैं ना भुलुंगा…

Category:

 

१९७५ साल ! जूनी ११ वीची परीक्षा संपली होती. त्या सुमारास आमच्या घरी सुभाषकाका आले होते. परीक्षा संपल्याच्या आनंदात ते मला आणि माझ्या भावाला उमा टॉकीज मध्ये नुकताच लागलेला “रोटी कपडा और मकान ” चा ९.३० चा शो बघायला घेऊन गेले. तेव्हापासून लता-मुकेशच्या “मैं ना भुलुंगा ” चे गारुड अजूनही अबाधित आहे.

  March 23, 2021


लेखसंग्रह

माणसांना उभे करणारे शब्द !

Category:

 

दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे.

  March 21, 2021


लेखसंग्रह

सर्वसामान्यत्वाचे “दिगू “करण !

Category:

 

मी शक्यतो राजकारण किंवा राजकारणी व्यक्तीसंदर्भात लिहीत नाही. कोणी मला पाठविले/ टॅग केले तर प्रतिसादही देत नाही. माझी (बरीवाईट) मते माझ्यापाशी. जसे आपण निवडणुकीत ज्याला द्यायचे त्यालाच मत देतो, पण दारी आलेल्या प्रत्येक पक्षाचे/उमेदवाराचे मान डोलावून स्वागत करतो, तसे माझे हे वागणे ! पण गेले काही महीने देश/राज्य पातळीवर जे काही चाललं आहे/ दिसतं आहे, वाचनात येत आहे, ऐकू येत आहे ते अस्वस्थ करणारं आहे.

  March 14, 2021


लेखसंग्रह

आलाप – “समझ गया, नींद आए तो सोही जाना चाहिए !!”

Category:

 

” जंजीर, दिवार, शोले ” च्या ” अँग्री यंग ” प्रतिमेतून हृषीदांना आणि दस्तुरखुद्द अमिताभलाही बाहेर पडावंसं वाटलं असेल , तो क्षण म्हणजे ” आलाप” ! पण दुर्दैवाने हे प्रतिमा -परिवर्तन चाललं नाही. चित्रपटभर त्वेषाने एकही ठोसा न मारणारा, सौम्य गायक अमिताभ चुकीच्या वेळी पडद्यावर आला. तो आणि त्याचे चाहते तोवर प्रगल्भ झाले नव्हते. अशोक सराफवरही पडलेला विनोदी अभिनेत्याचा शिक्का त्याला नीटसा पुसता आला नाही. ” सुशीला ” किंवा अलीकडचा “एक उनाड दिवस ” मध्ये त्याने परीघ ओलांडायचा प्रयत्न जरूर केला पण परत रिंगणात आला.

  March 12, 2021


लेखसंग्रह

प्रकाशात न आलेले सर्ग !

Category:

 

कित्येक कवी,लेखक,साहित्यिक आपले सगळेच लिखाण छापतात/ प्रकाशात आणतातच असे नाही. खूपसे सर्ग अंधारातच राहतात. आपल्या-तुपल्या सारखे रसिक अतृप्त राहतात जीवनभर -आपला काहीच दोष नसतानाही या खजिन्या पासून आपण वंचित राहतो. खूपसे गायक/ अभिनेते त्यांचे सगळे कर्तृत्व पडद्यावर/रंगमंचावर आणतातच असे नाही.

  March 7, 2021


लेखसंग्रह

रोड टू संगम – ही पण बाजू !

Category:

 

साधारण हीच सकाळची वेळ ! ब्रेकफास्ट आटोपून दुसऱ्या चहाची वाट पाहात असताना सहज टीव्ही च्या रिमोटची खुंटी पिरगाळली. स्टार गोल्डवर ” रोड टू संगम ” पाटी दिसली. नांव न ऐकलेले पण ओम पुरी व परेश रावल (सोबतीला काही मराठी नांवे – राजन भिसे, स्वाती चिटणीस वगैरे) !

  March 4, 2021


लेखसंग्रह

शिकारा – बोलका पांढरा पडदा !

Category:

 

आजवर चित्रपटगृहातील पांढरा पडदा “दाखवायचा”, काल मी त्याला दोन तास बोलताना पाहिलं. ही किमया साधलीय विधू विनोद चोप्राने ! शरणार्थी (?- हा शब्दच मुळात चुकीचा आहे – कोणाला शरण आलेत ते , जर मुळातून हा देश तुमच्या माझ्या इतकाच त्यांचा आहे.) काश्मिरींनी मूकपणे १९९० पासून जे सोसलंय, जे फारसं कालपर्यंत मलाच माहीत नव्हतं, त्या साऱ्यांच्या वतीने काल त्या पांढऱ्या पडद्याला बोलताना मी पाहिलं. कमल हसन च्या “पुष्पक ” प्रमाणे हा चित्रपट शब्दहीन असता तरी चाललं असतं.

  February 27, 2021


साहित्य - ललित

गुलजार – बात “एक” पश्मीने की !

Category:

 

हा मनुष्य कायम हातातून निसटतो. त्याचा स्पर्श जाणवतो, त्याचे शब्द भिडतात, त्याचे संवाद तीक्ष्णपणे काळजात घुसतात. त्याच्या धवल वस्त्रांवरचे फाळणीचे डाग पुसट होता होत नाही.

  February 16, 2021


साहित्य - ललित

सिमटी हुई ये घडियां’ – नात्यांचा लेखाजोखा !

Category:

 

सांगलीत वालचंदला असताना आम्ही “चम्बल की कसम ” नामक एक पडेल चित्रपट पाहिला तो खय्याम आणि साहिर या जोडगोळीच्या एका हळुवार प्रेमगीतासाठी ! अन्यथा राजकुमार, त्याला प्रतिकूल मौशुमी आणि होडीवाला ठोकळा शत्रुघ्न असलं कॉम्बिनेशन बघणं नजरेला फारसं आल्हाददायक नव्हतं.

  February 14, 2021


साहित्य - ललित

जगमे रह जायेंगे, प्यारे तेरे बोल!

Category:

 

१९७६ ला मुकेशचे पार दूर देशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि इकडे सोलापूरच्या दयानंदमधील आमच्या गॅदरिंग प्रॅक्टिसला मित्र अनिलला हुंदका आवरेना. तो आरके च्या ताज्या गाण्याची “इक दिन बिक जाएगा, माटी के मोल ” ( धरम -करम ) रिहर्सल करीत होता. त्यादिवशी एकट्या राज कपूरचा “आवाज ” गेला नाही. आम्ही आपोआप श्रद्धांजली मोडवर गेलो.

  February 11, 2021