साहित्य - ललित

नातं..

Category:

 

एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..!

  May 14, 2019


साहित्य - ललित

दहशत…

Category:

 

एक गोष्ट मात्र नक्की ज्यांनी जाणीवपुर्वक दहशतीचा सामना केला, निडर मनाने दहशतीला जे सामोरे गेले त्यांनी इतिहास घडवला आहे. सामान्य माणुस इतिहास घडवू शकत नसला तरी तो निडरपणाने जगू शकतो, दहशतीचा सामना करून.. हे मात्र नक्की.

  May 14, 2019


साहित्य - ललित

नवे नवेसे, हवे हवेसे…

Category:

 

असं म्हणतात, की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. तसे पहायला गेले तर कालचा दिवस आणि आजचा दिवस यात मोठा फरक तो काय? कालही सूर्य होता, चंद्र  होता… तारे होते… रात्र होती, दिवस होता. काल जे होते तेच आजही आहेच ना? मग बदलले ते काय? जे काल होते तेच आज आहे, म्हटल्यावर मनात उत्साहाची कारंजी का फुलावी… नव्या दमाचा उत्साह शरीरात का यावा.

  May 13, 2019


लेखसंग्रह

चालणे आणि चालणे…

Category:

 

अनादी कालापासून आपण चालत आहोत. अगदी रामायण काळ जरी म्हटला तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र थेट चौदा वर्ष चालत होते, वनवास होता ना. वामन अवतारात तीन पावलांत विश्व व्यापले गेल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पांडवही बारा वर्षे वनवासात होते, चालतच असतील ना. थोडक्यात काय तर चालणे आपल्याला सुटलेले नाही. आपण सारेच चालत आहोत… चालतच राहणार आहोत.

  May 13, 2019


अवर्गिकृत

कॉमन मॅन

Category:

 

हा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो.

  May 8, 2019