अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – ३० – दुकडीबाला देवी

Category:

 

इंग्रज क्रांतिकारकांच्या मागावर नेहमीच असत. असेच एकदा ते तपास करत करत दुकडीबाला ह्यांच्या घरी पोचले. तिथे त्यांना काही शस्त्र सापडलीत आणि दुकडीबाला देवी ह्यांना अटक करण्यात आली.

त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या जेणेकरून त्या आपल्या अन्य साथीदारांची नावं सांगतील, पण दुकडीबाला इंग्रजांच्या जाचापुढे बधल्या नाहीत. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, की एकही माहिती फुटू दिली नाही. त्यांना अडीच वर्षांचा सश्रम कारावास देण्यात आला.कारावासात असतांना सुद्धा त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या वाटेला नेहमीच इतरांपेक्षा जास्त कठीण कामं येत गेली आणि त्या करत गेल्या.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २९ – दुर्गावती वोहरा (दुर्गा भाभी)

Category:

 

नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २८ – प्रितीलता वड्डेदार

Category:

 

१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर

Category:

 

१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २६ – राजकुमारी गुप्ता

Category:

 

हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २५ – उमाबाई कुंदापुर

Category:

 

बिहार मधील भूकंप ग्रस्त क्षेत्र असो किव्हा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारी, उमाबाईचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता, त्याचे हात हक्काची मदत करणारे होते. १९४६ साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्ट च्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्राम सेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकार कडून कुठल्याच प्रकारची मदत नसतांना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २३ – शांताबाई नारायणराव सावरकर

Category:

 

शांताबाईंनी सावरकर घरात सगळ्यांचे मृत्यू पाहिले. गांधींवधा नंतर झालेला अतोनात छळ सोसला. त्यात डॉ जखमी झाले आणि त्या आजारपणा नंतर उठलेच नाहीत. ह्या खचल्या नाहीत. थोरल्याबाई, बाबाराव, माई, तात्या सगळयांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. मुलांना एकत्र बांधून ठेवले.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २२ – कॅप्टन लक्ष्मी सहगल

Category:

 

सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले.