भारतमातेच्या वीरांगना – २१ – डॉ उषा मेहता
Category:
अवर्गिकृत१४ ऑगस्ट १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले. त्याची सुरवात उषाजींच्या आवाजाने झाली, ‘हा काँग्रेस रेडिओ आहे ४२.३४ मिटर्स भारतातून’. ह्या वरून गांधीजींचे विचार, इतर मोठ्या नेत्यांचे विचार, देशभक्ती पर गाणे, कविता इत्यादी प्रसारित केले जायचे. इंग्रजांच्या तावडीतुन बचाविण्यासाठी हे आपल्या रेडीओची जागा जवळपास रोज बदलायचे. एवढी काळजी घेऊनसुद्धा इंग्रजांच्या हाती हे प्रकरण लागले. १२ नोव्हेम्बर १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आणि ४ वर्ष सश्रम कारावास दिला गेला.