व्यक्ती-परिचय

सूर तेच छेडिता – चिनार–महेश

Category:

 

मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली.

व्यक्ती-परिचय

एक आठवण ..स्वरभास्कराची…

Category:

 

पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग… मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी…

व्यक्ती-परिचय

चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

Category:

 

अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की!

व्यक्ती-परिचय

चोखंद़ळ – सोनाली खरे

Category:

 

दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली.

व्यक्ती-परिचय

रंग… कला… आणि कटिंग चहा – रवी जाधव

Category:

 

रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं.