व्यक्ती-परिचय

तिमिरातुनी तेजाकडे – डॉ. नरेंद्र दाभोळकर

Category:

 

एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते.

व्यक्ती-परिचय

सुरेश सरैया : सुरेल समालोचनाचे शतक

Category:

 

२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.

व्यक्ती-परिचय

पांडुरंग शास्त्री आठवले

Category:

 

दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला.

व्यक्ती-परिचय

भारतरत्नाच्या देशा

Category:

 

भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. साहित्य, कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा इत्यादी विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविले जाते.

व्यक्ती-परिचय

यतीन कार्येकर ते औरंगजेब : एक अद्भूत प्रवास

Category:

 

यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी.

व्यक्ती-परिचय

आठवणीतील गदिमा….पु.ल.देशपांडे

Category:

 

पुण्याला ‘बालगंधर्व’ थिएटर उभे राहत होते,गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्‍या चार ओळी पाहिजे होत्या. पंचवटी गाठली. माडगूळकरांना म्हणालो, “स्वामी, चार ओळी हव्या आहेत ….बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी”.मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले ,”असा बालगंधर्व आता न होणे.”

व्यक्ती-परिचय

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा)

Category:

 

अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

व्यक्ती-परिचय

चित्रपती व्ही. शांताराम

Category:

 

व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.

व्यक्ती-परिचय

भारतरत्न धोंडो केशव कर्वे

Category:

 

कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला