व्यक्ती-परिचय

अभिनय सम्राट “डॉ. काशिनाथ घाणेकर”

Category:

 

…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे.

व्यक्ती-परिचय

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे

Category:

 

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर शास्त्रीय संगीताचे गायन करणार्‍या सहस्त्रबुद्धे यांनी निष्ठेने शास्त्रीय संगीताची सेवा केली. उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ऑस्ट्रेलिया, युरोप, आखाती देश, तसेच उत्तर अमेरिकेसह विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते. त्यांनी अनेक शिष्य घडविले.

व्यक्ती-परिचय

बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते जी. पी. सिप्पी

Category:

 

सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल.

व्यक्ती-परिचय

बॉलिवूडचे गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान

Category:

 

सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

व्यक्ती-परिचय

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार सतीश दुभाषी

Category:

 

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एके काळचे नामवंत नाव म्हणजे सतीश दुभाषी. पु लं चे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे

व्यक्ती-परिचय

जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर

Category:

 

पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता याबरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. भारत सरकारने मा.मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.

व्यक्ती-परिचय

नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

Category:

 

श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत.