शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

गणेशदुर्ग किल्ला – कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. तेथे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी १८४४ साली बांधलेले गणेशमंदिर असून याच मंदिरात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात बैठक झाली होती.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

सांगली जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व र्‍हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

भात’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लागवडीखालील एकूण जमिनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

थिबा पॅलेस –  हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.