नाजूक कोमल कांती
केशसंभार खुललेले
मुखकमल गुलाब
पाकळ्यात फुललेले
रेखीव रेशीम काया
तनु तीरी नटलेली..
भावनांची विविधता
नयनात दाटलेली
लावण्यात बहरलेली
तू एक मोहिनी
पावलांची चाहूल
तू गीत रागिणी…
सौंदर्य तुला बहाल
मुक्तहस्ताने केले..
पद्मिनी तुला
मातृत्वाने गौरविले..
शक्ती चे विराट रूप
तू सौख्यदायीनी..
स्त्री तत्व तू निर्मिती
विश्व व्यापक जननी…
अनाधी काल अनंत
संहारले दृष्ट प्रवृत्ती
रूपे तुझी अनेक
तू च आत्म तेज जागृती
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/