मेघ दाटून येतात
मोर नाचतो अंगणी
सरी वर सर येता
चिंब भिजली अवनी.
वेली वृक्ष बहरले
थेंब टपोरे झेलूनी
धरणीला सुखावले
आज भरल्या मेघांनी..
श्रावणाच्या येती धारा
झुले झुलती वाऱ्यांनी..
माहेरच्या आठवणीं
आज आल्या परतूनी..
सजवले धरतीला
ओल्या हिरव्या पानांनी
नभांगण रंगविले
सप्तरंगी रंगातूनी..
ओल्याचिंब वाटेवरी
सर वेचिता श्रावणी .
फुललेल्या फुलासवे
मन गेले आनंदूनी
Author
Post Views: 4