प्रिय नंदिनी जाधव

पत्रास कारण की भावनांच आदान-प्रदान करणार पत्र,आज अचानक गायब झाल आहे,कितीतरी जणांचे आयुष्य याचं पत्रांनी घडवलं आहे.पत्र हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे.



पत्रास कारण की भावनांच आदान-प्रदान करणार पत्र,आज अचानक गायब झाल आहे,कितीतरी जणांचे आयुष्य याचं पत्रांनी घडवलं आहे.पत्र हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे.

पुस्तकात व बाहेर अवतीभवती आपल्याला अशा काही घटना दृष्टिक्षेपात येतात, ज्या आपल्याला प्रेरणा देऊन जातात, आपल्यात नवचैतन्य जागवून जातात, नैराश्याचें मळभ झटकून टाकतात. नुसते डोळे उघडे ठेवून चालत नाही तर निरीक्षण शक्तींचा वापर करून नुसत्या वैचारिक क्षेत्रात नव्हें तर सामाजिक क्षेत्रात प्रवेश करता यायला हवां. आपल्यामधील वैचारिक दारिद्र्यच आपल्याला स्वतः तून उमलू देत नाही, स्वतःची उन्नती करू देत नाही. एखादी यशोगाथा झाली की ती इतिहासाचा भाग बनते पण असं होता कामा नये एका यशोगाथेतून दुसरी यशोगाथा जन्म घ्यायला हवी तरच यशोगाथाची परंपरा चालू राहतें.समाज सेवेचा असा काही ठरलेला पॅटर्न नसतो, एखाद्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणें म्हणजेच समाजसेवेची सुरुवात होय.

आजच्या पिढीला जट काय हे माहित नाही त्यांना फक्त बट माहिती आहे,त्यांना जटा निर्मूलनासाठी सुधामूर्तींनी सुद्धा 3000 स्त्रियांचे जटा निर्मूलन केलें व त्यांचे 3000 टाके हे पुस्तक सुद्धा माहित नसावें. त्यांना 3000 टाके असलेली गोधडी, जटा निर्मूलन झालेल्या स्त्रियांनी भेट दिली, तेव्हा त्या म्हणाल्या “ही माझ्या जीवनातली सर्वात सुंदर भेट”. अश्या जमान्यात पत्र लिहीणं म्हणजे भावनेचा उत्तुंग आविष्कार होय.

पत्र ही आज मन मोकळं करण्याची जागा झालीआहे. नैराशाच्या चिखलाचें भवताल असूनही, कमळा सारखं उमलावं लागणार आहे,तूमच्या कडे पाहून हेच वाटतं. ‘तूमचा लढा देवावरच्या श्रद्धेविरोधात नाही तर देवाच्या नावाखाली शोषण करणाऱ्या प्रथांच्या विरोधात आहे. दाभोलकरांच्या हत्येनंतर तूम्ही तेजीत चाललेला आपला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सोडून दिला,आणि जात पंचायत, अघोरी प्रथा यांच्याविरोधात अंनिसच्या कामात हातभार लावला.तूमच्याच शब्दात”मी स्त्रियांचं बाह्यसौंदर्य वाढवण्यासाठी काम करत होते,त्यापेक्षा स्त्रियांचं आंतरिक सौंदर्य वाढवणं गरजेचं आहे.” या विचारापर्यंत पोहचत तूम्ही या कामात पूर्णवेळ झोकून दिलं.
तूमच्या कामाला वाखाणलं जातं ते जटा निर्मुलनाच्या कामासाठी. तूम्ही गेल्या दहा वर्षांत २७६महिलांना जटा मुक्त केलंय. त्यासाठी तूम्ही महाराष्ट्रातल्या १९ जिल्ह्यांमध्ये फिरला आहात. कायदा असूनही जटेशी जोडलेल्या अंधश्रद्धेची पाळमुळं अजूनही घट्ट आहेत, हे गेल्या दहा वर्षांच्या घटनांमधून समोर येतं.

अगदी ७ वर्षांच्या मुलीपासून ६० वर्षांच्या महिलेपर्यंतच्या केसेस तूम्ही हाताळल्या आहेत. .’मनातली जटा काढणं कठीण’ हे तूमच्याच वाक्यात सांगता येईल “जेव्हा मी जट कापली तेव्हा 3 वर्षांपासून न रडलेली ती मुलगी जोरजोरात रडायला लागली. आई म्हणत होती- देवी जागृत झाली म्हणून ती रडतेय. तेव्हा मी तिच्या आईला जवळ बोलवून दाखवलं. जटेच्या खाली एक पापुद्रा तयार झाला होता. त्या पापुद्राला कात्रीचं टोक लागलं होतं. त्या पापुद्राच्या खाली उवा, जखमा, किडे झालले होते. वारुळासारखी गत झाली होती”. याचा त्रास झाल्यानेच ती मोठमोठ्याने रडतेय हे आईलाही कळलें.जट काढली तर तिच्या भावाचा मृत्यू होईल, अशी धारणा आईची होती,पण जट कापल्यानंतर तिची ही धारणा बदलली.जटामुक्त झालेली मुलगी आज अकरावीत शिकतेय आणि आनंदी आयुष्य जगत आहे.

केवळ ग्रामीण भागातच हे घडतं असं नाही. शहरी आणि सुशिक्षित समाजातही या घटना दिसतात. तूम्ही आयटी इंजिनिअर, वकील, बीएस्सी शिक्षण असलेल्या तरूणीच्या डोक्यातली जटही कापलेली आहे.

“अशा धारणेमागे पुरुषसत्ताक विचार असतो . तूम्हाला पन्नास लोकांचं समुपदेशन करावं लागतं,कारण त्या महिलेला सतत सांगितलं गेलेलं असतं की तुला देवीने लाखांतून एक निवडलं आहे.जटा घेऊन वावरणाऱ्या महिलेला मानसिक त्रासासोबत शारिरक त्रासही सहन करावा लागतो. सात-आठ किलोचं वजन वागवल्याने मान, पाठ, मणका, डोळ्याचे आजार होतात. वजनामुळे शिराही ताणल्या जातात. पण हा सगळा त्रास त्या भीतीपोटी सहन करतात. महिलांना होणाऱ्या मानसिक त्रासामुळे दैवी शक्ती असल्याचा भ्रम तयार होतो आणि अंगात येण्यासारख्या आजाराला त्या बळी पडत.जट निर्मुलनाच्या कामात लोकांचं कधी-कधी वर्षभरही समुपदेशन करावं लागतं. तर कधी तुम्हाला होणारा विरोध खूप तीव्र असतो, तरीही तूम्ही मागे हटत नाहीत. शिवीगाळ, मारहाणीसाठी अंगावर धावून येणं, हाताला धरून घरातून बाहेर काढणं, फोनवरून धमकावणं हे तुम्हाला सवयीचं झालंय. अपमान म्हणजे तूमच्यासाठी फुलांचा वर्षाव असल्यासारखं आहे. तूमचे समुपदेशन व कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे.सामूहिक बदलाची सुरुवात एकट्यापासूनच होते.तुमची पायवाट मळवाट होवो. मळवाट असली की समाज भरकटत नाही.

Author