तरुण वयात मनू भाकर

रँकिंगद्वारे भारताची नेमबाजी स्टार बनली. सुप्त गुण वेळीच न ओळखले गेल्यामुळे त्यांची गळचेपी होते पण आयुष्याच्या प्रवासात कधी कधी ते उफाळून येतात. सुप्तगुण फक्त संधीची वाट पाहत असतात.भारताचे हरियाणा राज्य बॉक्सर आणि कुस्तीपटूंसाठी ओळखले जाते, येथे जन्मलेल्या खेळाडूंनी जगभरात आपला ठसा उमटवला आहे. मनू भाकर चा जन्म हरियाणातील झज्जर येथे झाला. मनू भाकरने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली.रिओ ऑलिम्पिक 2016 नुकतेच संपले असताना वयाच्या 14 व्या वर्षी तिने नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिने वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितले.तिचे सदैव साथ देणारे वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेतली आणि याच निर्णयाने एके दिवशी मनू भाकरला ऑलिम्पियन बनवले.2017 च्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये, मनू भाकरने ऑलिम्पियन आणि माजी जागतिक नंबर-1 हीना सिद्धूला चकित केले आणि 242.3 गुणांसह नवीन विक्रम केला. यामुळे त्याने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत हीनाचा परभव केला. मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले व भारताच्या मनू भाकरने पॅरिस 2024 मध्ये नेमबाजीत अजून एक ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. अशा रीतीने ऑलिंपिक मध्ये दोन पदके मिळविण्याचा तिने विक्रम केला.

ISSF विश्वचषक 2023 भोपाळ: मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकली.
ISSF ज्युनियर वर्ल्ड कप सुहल: भारतीय नेमबाजांनी सात पदके जिंकली; मनू भाकरने रौप्यपदक पटकावलं.मुलांचे हट्ट छंद जोपासण्यासाठी निश्चित पुरवायला हवेत. मुलांचे अनेक हट्ट, आशा, इच्छा, आकांक्षा परिस्थितीमुळे हवेत विरून जातात. आपल्यातलें सुप्त गुण आपण ओळखायला हवेत. सुप्त गुण पालकांनी ओळखायला हवेत,शाळेंनी ओळखायला हवेत. आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांच्या प्रतिभा फुललेल्या आहेत. शाळेत न जाणाऱ्यांनीही आपली प्रतिभा फुलवली आहे. बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या कवितेमधून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आहे, त्यांच्या कविता विद्यापीठ स्तरावरही अभ्यासल्या जातात. योग्य परिस्थिती व वातावरण मिळाल्यास सृजन अवतरल्याशिवाय राहत नाही. खडकाच्या कपारीत सुद्धा एखादा रोपट स्वतःचा अस्तित्व दाखवतं. गरिबी, दारिद्र्य या गोष्टी स्वतःला सिद्ध करण्यापासून रोखू शकत नाहीत. जगणं जेव्हा चाकोरी बद्ध होतं, तेव्हां नाविन्याची कास धरता येत नाही. छंद जोपासण्यासाठी घरात, शाळेत पोषक वातावरण हवं. आपल्या मुलांना केवळ डॉक्टर व इंजिनिअर होण्यासाठीच पालकांचे प्रयत्न असतात. अनेक प्रकारचे महागडे क्लास लावून, विद्यार्थ्यांना छंद जोपासण्यासाठी वेळच मिळत नाही. स्वतः स्वतःला वेळ दिल्याशिवाय आपली ओळख पटत नाही. स्वतःच स्वतःवर प्रेम केलं की आपल्यातले चांगले गुण कळतात. यश हे एका रात्रीतून कधीच मिळत नाही. मुलांना चांगल्या सवयी लावणं पालकांच्या हातात आहे. आपल्या मुलांकडे केवळ भविष्यातील गुंतवणूक म्हणून न पाहता वेगळा दृष्टिकोन आज पालकांनी ठेवावा.कोटाला विद्यार्थ्यांना पाठवणं हाच काही पालकांचा आयुष्याचा कोटा आहे.कोटाला जाणं हा निर्णय पालकांचा असतो, अनेक विद्यार्थी पालकांची इच्छा पूर्ण न करता आल्या मूळें आत्महत्येला जवळ करतात.मुलें छंदात रमली तर नावलौकिक होणारच आहे.

मनु भाकर या नावाची देशभरात चर्चा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्याच दिवशी पदकांचं खात उघडून दिलेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक जिंकत मनु भाकरने इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनलीये. आता सर्व जगभरातून कौतुक होत असलं तरी चॅम्पियन खेळाडूचा प्रवास काही सोपा राहिलेला नाही.
मनु भाकरचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 मध्ये हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील जाट कुटुंबात झाला होता. मा शाळेतील पीटी टीचरने त्यांना सांगितलं की मनुला स्पोर्ट्समझध्ये टाका. डॉक्टरांना फक्त गाव आणि जवळेच लोक ओळखतात पण एखाद्या खेळाडूला संपूर्ण देश ओळखतो. मनुचे वडील राम किशन यांचं तिला बॉक्सर बनवण्याचं स्वप्न होतं. मनुचा मोठा भाऊ अखिल भाकरही बॉक्सिंग करत होता. भावाचं पाहत तिनेही बॉक्सर होण्याचं ठरवलं आणि तयारी सुरू केली. बॉक्सिंगमध्येही तिने चांगली कामगिरी केली मनु नॅशनल लेव्हलपर्यंत खेळली आणि मेडलही जिंकले. मात्र सरावावेळी मनुच्या डोळ्याला जखम झाली आणि तिला बॉक्सिंग सोडावी लागली.
मनुने त्यानंतर मार्शल आर्टसची ट्रेनिंग घेऊ लागली. मात्र तिने काही दिवसातच हा खेळ सोडण्यचं ठरवलं पण या खेळामध्ये चीटिंग होते असं तिचं म्हणणं होतं. मुनने स्केटिंग, टेनिस आर्चरीमध्ये तिने भाग घेतला मात्र तिचं मन लागत नव्हतं. मनु तिच्या आईच्या शाळेत शुटींग रेजमध्ये एक शॉट मारला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पीटी टीचर अनिल जाखड यांनी तिच्यातील क्षमता ओळखली होती. मनुच्या पालकांना त्यांनी सांगिकतलं की तुम्ही मुलीला स्पोर्टसाठी वेळ द्या, ही देशासाठी नक्की पदक आणेल. अनिल जखड यांचं हे वाक्य खरं ठरलं आणि मनुनेही आज इहिास रचलाय. मनु भाकरची आई तिला ‘झाँसी की राणी’ म्हणत असे.मनु या शब्दाचा अर्थ ‘झाँसी की राणी’ असाही होतो. मनु भाकर हिने आपली पहिली नॅशनल टूर्नामेंट भाड्याने पिस्तुल घेऊन ती खेळली होती. पिस्तुलच्या लायसन्ससाठी तिच्या वडिलांनी खूप संघर्ष केला‌होता. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यानुसार कोणत्याही फळाची न अपेक्षा ठेवत कर्म करत रहायला हवं..तर आता मनु भाकर या नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळवणारी एकूण पाचवी भारतीय आणि पहिली महिला ठरली आहे.मनु भाकरने ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 पदकं जिंकली आहेत. यशाचा इतिहास निर्माण करण्यासाठी अनेक अपयशांचा सामना करावा लागतो. मनु भाकरच यश असंच आहे.

Author