प्रेरणेच्या पायवाटा

मळलेल्या पायवाटेनेच अनेकांचा प्रवास सुरू असतो. संघर्षमय जीवन जगत असताना अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. संघर्षाचा सामना करता करताच यशाची पायवाट होतें.

सगळेच मार्ग जेव्हां बंद होतात तेव्हा कुणीतरी प्रेरणा देतं. प्रेरणा नावीन्याला जन्म देतें.नाविन्याला जिद्यीचं निमित्त लागतं.अनेकांनी स्वतःच्या पायवाटा स्वतः निर्माण केल्या आहेत यशोशिखराकडे नेणाऱ्या, ज्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. अशीच एक प्रेरणादायी वाटचाल शीतल देवी हीची आहे.



मळलेल्या पायवाटेनेच अनेकांचा प्रवास सुरू असतो. संघर्षमय जीवन जगत असताना अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. संघर्षाचा सामना करता करताच यशाची पायवाट होतें.

सगळेच मार्ग जेव्हां बंद होतात तेव्हा कुणीतरी प्रेरणा देतं. प्रेरणा नावीन्याला जन्म देतें.नाविन्याला जिद्यीचं निमित्त लागतं.अनेकांनी स्वतःच्या पायवाटा स्वतः निर्माण केल्या आहेत यशोशिखराकडे नेणाऱ्या, ज्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. अशीच एक प्रेरणादायी वाटचाल शीतल देवी हीची आहे.

शरीराने अपंग असलेल्यांनीही यशश्री खेचून आणली आहे.मनाचं अपंगपण नैराश्य,अपयश याला जन्म देतं. शीतल जगातील एकमेव हात नसलेली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने नुकतेच हँगझोऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत. एक रौप्य पदक आणि दोन सुवर्णपदके तिने मिळवली आहेत. अवघ्या १६ वर्षांची शीतल एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदक कमावणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे.

“आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात हवी.अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर मनात असलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करता येतं. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतीय महिला तीरंदाज शीतल. जगातील एकमेव हात नसलेली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने नुकतेच हँगझोऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत. एक रौप्य पदक आणि दोन सुवर्णपदक तिने मिळवले आहेत. अवघ्या १६ वर्षांची शीतल एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदक कमावणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे.

महिलांच्या दुहेरीत‌ रौप्यपदक पटकावल्यानंतर शीतलने कम्पाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर शीतलने मिश्र दुहेरीतही सुवर्णपदक जिंकले आहे. दोन्ही हात नसताना शीतलने पायाने आपले लक्ष्य भेदून हे यश मिळवले आहे. अंतिम फेरीत शीतलने सिंगापूरच्या अलिम नूर स्याहिदाहचा १४४-१४२ असा पराभव केला.

१६ वर्षीय शीतल देवी ही जम्मू-काश्मीरच्या लोह धार गावात किश्तवार येथे राहते. जम्मूच्या माता वैष्णोदेवी तीरंदाजी अकॅडमीमध्ये ती प्रशिक्षण घेते. शीतलचा जन्म फोकोमेलिया या दुर्मिळ जन्मजात विकाराने झाला होता, ज्यामुळे अंग विकसित होत नाही. शीतलला जन्मापासूनच हात नाही, तरीही तिने हार मानली नाही. तिने फक्त ११ महिन्यांपूर्वी शूटिंग सुरुवात केली होती. इतक्या कमी वेळात तिने तिरंदाजी प्रकारात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अशक्य वाटणारी गोष्ट शीतलने शक्य करून दाखवली आहे.

शीतलने सांगितले की, “सुरुवातीला मला धनुष्य नीट उचलताही येत नव्हते, पण दोन महिने सराव केल्यानंतर ते सोपे झाले. माझ्या पालकांचा माझ्यावर नेहमीच विश्वास होता. गावातील माझ्या मित्रांनीही मला साथ दिली. मला एक गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे जेव्हा लोकांना समजते की माझ्याकडे हात नाही, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात. पण, या पदकामुळे मी खास असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. हे पदक फक्त माझे नाही, तर संपूर्ण देशाचे आहे.”संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो. प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे. पण, जेव्हा शीतल देवीसारख्या अशक्यही शक्य करून दाखवणाऱ्या लोकांना पाहिले की समजते, त्यांच्या संघर्षापुढे आपला संघर्ष काहीही नाही. शीतलकडून जर काही शिकायचे असे तर तिच्यासारखी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात बाळगायला शिका. परिस्थिती कितीही अवघड असो, आपले स्वप्न पाहायला शिका आणि ती पूर्ण‌‌ करायला शिका. शीतलचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना प्रोत्साहन देणाराच ठरलां आहे. अपयशाचा शिक्का बसलेल्यांनीही यशाची मोहर उमटवली आहे.हे अनेकांनी सिध्द केलं आहे.महिंद्रा आनंद यांनी तिला पाहिल्यानंतर असे उद्गार काढले की “मी आता माझ्या आयुष्यात छोट्या छोट्या समस्यां बद्दल तक्रार करणार नाही.”आपल्याला प्रेरणा छोट्या कडूनही मिळतें हेच यावरून स्पष्ट होते. स्वप्नांची सुरुवातीला खिल्ली उडवली जाते पण स्वप्न पूर्ण झाल्यावर इतरांसाठी ती प्रेरणेची पायवाट बनते, छत्री पाऊस थांबू शकत नाही पण पावसात उभे राहण्याचें धाडस देतें, तसंच काहीसं प्रेरणे चे आहे.

Author