पर्यावरणाचे नियम पाळा



पावसाळा आला सुरु झाला

वृक्षरोपणाचा संकल्प केला

पंधरा ऑगस्टला शाळेत जमले

बागेत खड्डे बरेच खणले

मुला-मुलींनी रोपे लावली

शिक्षकांनी शाबासकी दिली

नियमीत पाणी घालू लागले

निगा झाडांची राखू लागले

खत-पाणी-वारा

झाडे वाडली भराभरा

सावली मध्ये बसून बाळांनो

अभ्यास चांगला करा करा

झाडांसंगे गाणी गा

वार्‍यांसंगे धावा-पळा

शरीर संपदा लाभण्यासाठी

पर्यावरणाचे नियम पाळा.

— सौ. सुधा नांदेडकर

Author