ओलेत्या स्वराने गाती
ओल्याचिंब श्रावणधारा..
मन तरंग उठती नवेच
तनमनात बेधुंद शहारा..
पावसाचे थेंब बरसले
स्पर्शाने केली कुजबूज..
मनातल्या लाटेचे ऐकले
जणू त्यांनी मधुर गुज..
बहरल्या धरेचा रंग
सरीतेच्या डोही जलधारा..
पदराची खोड काढतो
अवेळीच उनाड वारा..
बंधनांची वादळे किती
आभाळ दाटले पुन्हा
आभास तुझा म्हणूनी
भिजण्याचा केला गुन्हा
घन व्याकूळ होऊन
येतील वाऱ्या सवे..
विरहाची सांगतील व्यथा
पुसतील माझी आसवे..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/