मनातला मोगरा

कळ्या फुलांचे
अवचित येणे
मागून लाजणे
चंद्र. ताऱ्यांचे

बटा छेडतो
गाली गुलबक्षी
सोनेरी छटांशी
मोगरा मोहतो..

सखी दिसावी
चंचल कामिनी
तशीच मोहिनी
त्याला पडावी..

कुंतली तुझ्या
सजला गजरा
दिसतो साजरा
लोचनी माझ्या..

व्हावे मोगरा
तुला बिलगून
द्यावा उधळून
गंधित वारा



कळ्या फुलांचे
अवचित येणे
मागून लाजणे
चंद्र. ताऱ्यांचे

बटा छेडतो
गाली गुलबक्षी
सोनेरी छटांशी
मोगरा मोहतो..

सखी दिसावी
चंचल कामिनी
तशीच मोहिनी
त्याला पडावी..

कुंतली तुझ्या
सजला गजरा
दिसतो साजरा
लोचनी माझ्या..

व्हावे मोगरा
तुला बिलगून
द्यावा उधळून
गंधित वारा

Author