ओंजळीतली कळी
फुलात कधी उमलते
न कळतच दुज्या
अंगणात बहरते..
भातुकलीचा खेळ
चिमुकली खेळते..
संसारात पहिले
पाऊल तिचे पडते..
इवल्याश्या हाताने
ती भरवते खाऊ
सासरी जाताना
वळून नको पाहू..
मायेच्या कुशीत ती
येते दुडूदुडू धावून
पाठवणी करताना
रूखरुख मनी राहून ..
छोट्याश्या छकुलीचा
सगळा पुरवला हट्ट
किती ही दूर तरी
नाते आमचे घट्ट..
लहान किंवा मोठी
ती तर काळीज असते
लेक परक्याचे धन तरी
आई बाबांची ठेव असते..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/