हेलन केलर

मुलांच्या संदर्भातल्या समस्या म्हणजे मुले स्क्रीन टाईमचा वापर खूप करतात, त्यासाठी पालक हतबल आहेत.

एखाद्या वस्तूच्या अतिवापरामुळे आपणच एखादं व्यंग निर्माण करतो. व्यंगावर मात करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीही अनेकांनी व्यंगावर मात केली आहे हे आमच्या मुलांना कळायला हवं. अनेकांनी व्यंगावर मात तर केली आहेच, पण यशश्रीही खेचून आणली आहे.



मुलांच्या संदर्भातल्या समस्या म्हणजे मुले स्क्रीन टाईमचा वापर खूप करतात, त्यासाठी पालक हतबल आहेत.

एखाद्या वस्तूच्या अतिवापरामुळे आपणच एखादं व्यंग निर्माण करतो. व्यंगावर मात करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीही अनेकांनी व्यंगावर मात केली आहे हे आमच्या मुलांना कळायला हवं. अनेकांनी व्यंगावर मात तर केली आहेच, पण यशश्रीही खेचून आणली आहे.

निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियाच्या साहाय्याने आपण परस्पराशी सभोवतालच्या जगाशी संवाद साधतो. संवादाला जशा मर्यादा आहेत तशा प्रत्येक इंद्रियाच्याही मर्यादा आहेत. अशाही काही व्यक्ती आहेत की ज्यांची ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली, तरीही त्यांच्या आशावादी मनोवृत्तीने विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता याच्या जोरावर त्यांनी साऱ्यावर मात केली. आपले स्वतःचे जीवन परिपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूकबधिर यांनाही प्रगतीच्या विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरचं जीवन वेधक, रोमांचक, स्फूर्तिदायक आहे.

हेलन केलर हे माणसाच्या आत्मविश्वासाचे आणि अपराजित वृत्तीचे एक सुंदर प्रतीक आहे. हेलनने जगातील सर्व अंध, मूकबधिर यांना प्रगतीच्या विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. ती आंधळी, बहिरी व मुकी होती पण केवळ जिद्दीने सर्व अडथळे तिने पार केले.

हेलनची तर तीन ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली होती. फक्त परस्परांशी संपर्क जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन लाभूनही तिने मोठ्या परिश्रमाने अनेक लोकांनाही मान मिळवून दिला. त्यांच्या जीवनात आशा निर्माण झाली याला हेलनचेच कर्तृत्व कारणीभूत आहे.

एकेकाळी अपंग माणसांना जगावेगळे मानले जात असे, त्यांना कटाक्षाने दूर ठेवले जाई. अपंगाबद्दलची सर्वसामान्य माणसाची वृत्ती बदलण्याचे श्रेय हेलन यांनाच देता येईल. हेलनने केवळ स्वतःच्या व्यंगावर विजय मिळवला नाही, तर सर्वच अपंगाविषयी जगाची सहानुभूती संपादन करण्यात तिने आपले आयुष्य वेचले.
अपंग लोकांना सर्वात अधिक आवश्यकता जर कशाची असेल तर ती तज्ज्ञ आणि सहृदयी अशा शिक्षकाकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची.

प्रसिद्ध ग्रीक कवी होमर हा आंधळा होता. जॉन मिल्टने आपलं सर्वश्रेष्ठ काव्य दृष्टी गेल्यानंतरच लिहिलं आणि थॉमस एडिसन ज्याने विजेच्या दिव्याला कार्यक्षम स्वरूप दिलं, तो अगदी. ठार बहिरा होता. खरोखर यशस्वी जीवन जगण्यासाठी आपली सारीच ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असावी लागतात, असं मुळीच नाही.

अंधासाठी लिपी ब्रेल नावाच्या एका आंधळ्या माणसानेच तयार केलेली आहे. ब्रेल वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी एका अपघातात आंधळा झाला होता. पुठ्ठ्यावरील उठावदार अक्षरांच्या साहाय्याने त्यांचे शिक्षण झाले; पण ब्रेल सुमारे वीस वर्षांचा झाला तेव्हा अंधासाठी एखादी सहस सुलभ लिपी हवी, असे त्याला वाटू लागले. उठावाच्या अक्षरांच्या साहाय्याने अक्षरओळख करून घेणे हे अंदाजाबाबतीत फार अडचणीचे व गुंतागुंतीचे होते आणि मग ब्रेलने स्वतःच टिंबावर आधारलेली ही नवीन लिपी शोधून काढली. हेलनने ब्रेल लिपी शिकून घेतली. व्यंगावर मात कशी करायची हे आजच्या पिढीला समजायला हवं. निसर्गाने दिलेल्या व्यंगावर काही प्रमाणात मात करता येते. पण आपण स्वतःच मोबाईलच्या साहाय्याने स्वतःमध्ये व्यंग निर्माण करत आहोत हे आमच्या मुलांना कळायला हवे व त्यावर मात कशी करायची हे त्यांच्यासमोर अशा यशोगाथा आल्या तरच त्यांच्यामध्ये जाणीवजागृती होईल. सातत्याने जाणीव जागृती केल्यानेच समाजामध्ये सुधारणा झाल्या आहेत.

Author