दिनांक ३ मे, भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्मदिवस. याच दिवशी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पूर्णतः भारतीय चित्रपट लोकांसाठी प्रदर्शित केला.
सुमारे ५० चित्रपट आणि जवळपास तेव्हढेच लघुपट निर्माण करून, भारतीय चित्रपट व्यवसायाला स्थापित करणाऱ्या दादासाहेब फाळके यांचं युग बोलपटाच्या आगमनाने संपलं. त्यांच्या वाट्याला काहीशी उपेक्षा आली. मात्र १९७० मध्ये फाळके जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुन्हा त्यांच्या कार्याचा विविध माध्यमातून गवगवा होऊ लागला आणि आता तर त्यांच्या चरित्रावर आधारित बॉलीवूड फिल्म येत आहे. याविषयी सांगतायत, दादासाहेबांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर. आपण पहा, इतरांना पाठवा आणि हा अनमोल ठेवा जतन करा…..
संकल्पना : नरेंद्र बेडेकर
निर्मिती : तारांकित